शिरखेड येथे सहविचार सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:15 AM2021-08-23T04:15:20+5:302021-08-23T04:15:20+5:30

मोर्शी : तालुक्यातील शिरखेड येथील विवेकानंद विद्यालयात मुख्याध्यापकांची सहविचार सभा तसेच सेवानिवृत्त व नवनियुक्त मुख्याध्यापकांचा सत्कार पार पडला. तालुका ...

Sahavichar Sabha at Shirkhed | शिरखेड येथे सहविचार सभा

शिरखेड येथे सहविचार सभा

Next

मोर्शी : तालुक्यातील शिरखेड येथील विवेकानंद विद्यालयात मुख्याध्यापकांची सहविचार सभा तसेच सेवानिवृत्त व नवनियुक्त मुख्याध्यापकांचा सत्कार पार पडला.

तालुका मुख्याध्यापक संघाच्यावतीने विवेकानंद विद्यालयात सहविचार सभा झाली. अध्यक्षस्थानी विवेकानंद सेवा संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून अरविंद तट्टे, मोर्शी तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुधाकर धोटे, सचिव प्रवीण लांडे, रमेश मोहकार, प्रकाश घोरमाडे, सुधाकर राजस, बाळासाहेब काळे, लवकुमार पाथरे, विवेकानंद शाळेचे मुख्याध्यापक जे.एम. देशमुख, अविनाश साळकर, संजय कांदलकर, राजेंद्र हिरडे, संदीप ढोरे, गजानन रोडगे, रोहित मेश्राम उपस्थित होते.

या सभेत शासनातर्फे देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती, आयकर बाबत असणाऱ्या विविध अडचणी,शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणी,भविष्य निर्वाह निधी, शिक्षकांच्यास विविध रजा व रजांचे रोखीकरण,ऑनलाईन अभ्यासक्रम, ऑफलाईन पद्धतीने शाळा सुरू करणे व मुख्याध्यापकांना येणाऱ्या विविध प्रशासकीय अडचणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी नवोदय विद्यालय (हिवरखेड) सविता ठाकरे व प्रकाश घोरमाडे, गांधी विद्यालय (काटपूर) येथील धोटे व सुधाकर राजस, ई.एस. हायस्कूल (रिद्धपूर) येथील विनोद पाचडे व बाळासाहेब काळे, लोकमान्य विद्यालय (पोरगव्हाण) येथील विजय काकडे, शिवाजी शाळेचे श्रीकांत देशमुख या आजी-माजी मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. संचालन मीनाक्षी तट्टे, प्रवीण लांडे, प्रास्तविक जगदीश देशमुख व आभार प्रदर्शन मंजूषा देशमुख यांनी केले.

Web Title: Sahavichar Sabha at Shirkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.