साहिर आधी कोरोनात, आता युद्धामुळे परतला घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2022 05:00 AM2022-02-28T05:00:00+5:302022-02-28T05:00:53+5:30

चांदूर रेल्वे येथील प्राध्यापक प्रसन्नजित तेलंग यांचा मुलगा साहिर हा युक्रेनचे प्रशासकीय केंद्र असलेल्या चेरनिव्त्सी शहरातील महाविद्यलयात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला आहे. दोन महिन्यात नॅशनल  एक्झाम देऊन त्या पदवी मिळणार होती. युद्धामुळे सुरळीत सुरू असलेला शैक्षणिक प्रवास थांबला आहे. कोरोनामुळे आधी त्यात खंड पडला होता. आता युद्धानंतर परिस्थिती किती दिवसांनी सावरते, याच्या प्रतीक्षेशिवाय गत्यंतर नाही, असे तो म्हणाला.

Sahir first in Corona, now back home due to war | साहिर आधी कोरोनात, आता युद्धामुळे परतला घरी

साहिर आधी कोरोनात, आता युद्धामुळे परतला घरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : युद्धजन्य स्थितीतून बाहेर कधी पडणार, हा एकमेव विचार युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सतावत आहे. रशियाच्या फायटर विमानांमधून सातत्याने बॉम्बवर्षाव होत आहे. त्यामुळे जिवाची भीती आणि कुटुंबाला पारखे झालेल्या या विद्यार्थ्यांची  पहिली तुकडी शनिवारी रात्री विमानाने भारतात पोहोचली आणि सर्वांना रडूच कोसळले. यावेळी सुटकेचा नि:श्वास चांदूर रेल्वे येथील सारंग तेलंगनेही सोडला. तो या विमानाने भारतात परतणारा पहिला अमरावतीकर ठरला. 
चांदूर रेल्वे येथील प्राध्यापक प्रसन्नजित तेलंग यांचा मुलगा साहिर हा युक्रेनचे प्रशासकीय केंद्र असलेल्या चेरनिव्त्सी शहरातील महाविद्यलयात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला आहे. दोन महिन्यात नॅशनल  एक्झाम देऊन त्या पदवी मिळणार होती. युद्धामुळे सुरळीत सुरू असलेला शैक्षणिक प्रवास थांबला आहे. कोरोनामुळे आधी त्यात खंड पडला होता. आता युद्धानंतर परिस्थिती किती दिवसांनी सावरते, याच्या प्रतीक्षेशिवाय गत्यंतर नाही, असे तो म्हणाला. त्याचे मन अजूनही कॉलेज कॅम्पसमध्येच गुंतल्याचे चेहऱ्यावर झळकत होते. 

मुलापुढे सर्व गौण 
युद्धग्रस्त स्थितीतून मुलगा पहिल्याच फ्लाईटने घरी सुखरूप पोहोचल्याचा आनंद प्रसन्नजित तेलंग यांच्या चेहऱ्यावर होता. इतर पालकांनाही त्यांची मुले सुखरूप मिळोत, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.

बसने नेले रोमानियाला 
चेरनिव्त्सी हे मोठे शहर आहे. येथे हजारो विद्यार्थी, त्यात भारतीय प्रवेशित आहेत. बंकरमध्ये शरण घेतलेल्या या युवकांना बसने रोमानियाच्या सीमेवर व तेथून चेक इन करून राजधानी बुखारेस्ट येथील विमानतळावर नेण्यात आले. तेथे एअर इंडियाच्या विमानाने शनिवारी रात्री मुंबईत आणण्यात आले. तेथून घरी आल्याचे साहिरने सांगितले. 

दररोज बॉम्बिंग
युक्रेनची राजधानी किव्हवर दररोज बॉम्बिंग केले जात आहे. त्यामुळे या देशात शिकण्यासाठी गेलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासमवेत त्यांचे पालकदेखील चिंताग्रस्त आहेत. एकमेकांशी परिचय, संपर्क असलेल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांचे पालक विचारपूस करतात. 

अमरावतीच्या विद्यार्थ्यांशी पालकमंत्र्यांचा संवाद
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर हजारो भारतीयांसोबतच तिथे अडकलेल्या  साहिरसह जिल्ह्यातील अभिषेक बारबडे, प्रणव फुसे, तुषार गंधे, तनिष्क सावंत, वृषभ  गजभिये, स्वराज पौंड आणि प्रणव भारसाकळे या आठ विद्यार्थ्यांचा संपर्क क्रमांक मिळताच महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी तातडीने त्यांच्याशी संवाद साधला व दिलासा दिला. तिवसा तालुक्यातील तुषारसह सर्वांना धीर देत केंद्राच्यावतीने लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाठपुरावा सुरू आहे, असे पालकमंत्री म्हणाल्या.

 

Web Title: Sahir first in Corona, now back home due to war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.