शेतकरी हितार्थ अन्नत्याग आंदोलन
By admin | Published: June 16, 2016 12:36 AM2016-06-16T00:36:23+5:302016-06-16T00:36:23+5:30
शेतकऱ्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना गेंड्याची कातडी पांघरलेल्या निगरगट्ट शासनाचा निषेध म्हणून प्रहार...
विविध मागण्या : प्रहारचा पुढाकार
तिवसा : शेतकऱ्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना गेंड्याची कातडी पांघरलेल्या निगरगट्ट शासनाचा निषेध म्हणून प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष राज माहोरे यांनी १३ जून सोमवारी तिवसा तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केले.
राज्यभरात शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती असून कांद्याला जीवनावश्यक वस्तूंमध्ये टाकून निर्यातबंदी केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना विनाअट कर्ज देण्यात यावे. शेतकरी हितार्थ स्वामिनाथन आयोग तत्काळ लागू करण्यात यावा, या मागण्या शासनाने तत्काळ पूर्ण कराव्या, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शासन उदासिन असल्याचा आरोप देखील प्रहारचे राज माहोरे यांनी केला. यावे ळी शहराध्यक्ष भूषण यावले, युवा स्वाभिमानचे धीरज केने, भारिपचे जानराव मनोहर, दिलीप शापामोहन, आदी उपस्थित होते. आंदोलनाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. (तालुका प्रतिनिधी)