जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांचे वेतन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:36 AM2021-01-08T04:36:11+5:302021-01-08T04:36:11+5:30
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय इर्विन) येथील परिचारिकांना नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे वेतन व सातव्या ...
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय इर्विन) येथील परिचारिकांना नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे वेतन व सातव्या वेतन आयोगाचा हप्ता अद्यापपर्यंत मिळालेला नाही. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास वरिष्ठ कार्यालयातून निधी उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात आले. याविषयी जिल्हाधिकारी व वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
आरोग्य उपसंचालक, जिल्हाधिकारी यांना यापूर्वीही निवेदन देण्यात आले. याशिवाय विभागीय आयुक्त यांनादेखील निवेदन दिले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोविड रुग्णालयाला येथे भेट दिली असता, नियमित वेतन देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. तरीसुद्धा परिचारिकांचे अद्याप नियमित वेतन झालेले नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयात निवेदन देऊन ही बाब लक्षात आणून दिली. कोरोना संकटकाळात परिचारिका नियमित सेवा देत असताना नियमित वेतन मिळत नसल्याने महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटनेमार्फत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.