शालार्थ प्रलंबित प्रकरणे १५ दिवसांत निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 10:03 PM2018-06-30T22:03:40+5:302018-06-30T22:04:21+5:30
विभागातील शालार्थची प्रलंबित प्रकरणे येत्या १५ दिवसांत निकाली काढून स्था. स्व. संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता ९ व १० वी करिता ४० विद्यार्थ्यांमागे शिक्षकांची ३ पदे मंजूर केली जाणार आहे. ५ जुलै २०१६ पूर्वीच्या शिक्षकांना अनिवार्य असलेली संचमान्यतेची अट रद्द करण्याबाबत शिक्षक संचालकांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विभागातील शालार्थची प्रलंबित प्रकरणे येत्या १५ दिवसांत निकाली काढून स्था. स्व. संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता ९ व १० वी करिता ४० विद्यार्थ्यांमागे शिक्षकांची ३ पदे मंजूर केली जाणार आहे. ५ जुलै २०१६ पूर्वीच्या शिक्षकांना अनिवार्य असलेली संचमान्यतेची अट रद्द करण्याबाबत शिक्षक संचालकांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी सांगितले.
विभागातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शेखर भोयर यांनी शनिवारी शिक्षण संचालक गंगाधर म्हमाने, संचमान्यता व शालार्थचा कार्यभार असलेले प्रशासकीय अधिकारी राजेश शिंदे तसेच कमविचा कार्यभार असलेले भुसे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. प्रलंबित प्रश्नांचा निपटारा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी संतोष कुर्हेकर, कमर इकबाल व सुमित वानखडे आदी उपस्थित होते. प्लान वेतनाचे नॉन प्लान वेतनात रूपांतर करावे, प्रलंबित वैद्यकीय देयकाचा प्रश्न निकाली काढावा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रलंबित प्रश्नांचा निपटारा करावा आदी विविध प्रश्नांबाबत सकारात्मक संवाद झाल्याचे भोयर म्हणाले.
अन्य समस्याही मार्गी लागणार
या चर्चेदरम्यान शिक्षकांचे सेवासातत्य, पदमान्यता अवैध ठरविल्यासंदर्भातील चर्चा, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी व नंतर नियुक्त झालेल्या शिक्षक व इतर सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करणे, २००५ पूर्वी अंशत: अनुदानित तत्त्वावर रुजू झालेल्या व उच्च न्यायालयातून स्थगिती मिळालेल्या शिक्षक व इतर सर्व कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते सुरू करणे, सेवेत असताना जे कर्मचारी मृत पावले आहेत, त्यांच्या पाल्यांना जुनी पेंशन योजनेचा लाभ मिळवून देणे आदीविषयी सकारात्मक चर्च्चा झाल्याचे शेखर भोयर म्हणाले.