हस्तांतरित ९७० भूखंडाची महापालिकेद्वारा विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:06 AM2021-08-02T04:06:04+5:302021-08-02T04:06:04+5:30

अमरावती : विकास शुल्काअभावी विविध लेआऊटमधील महापालिकेला हस्तांतरीत करण्यात आलेल्या ९७० भूखंडाची विक्री आतापर्यंत प्रशासनाद्वारा करण्यात आलेली आहे. ...

Sale of 970 plots transferred by Municipal Corporation | हस्तांतरित ९७० भूखंडाची महापालिकेद्वारा विक्री

हस्तांतरित ९७० भूखंडाची महापालिकेद्वारा विक्री

Next

अमरावती : विकास शुल्काअभावी विविध लेआऊटमधील महापालिकेला हस्तांतरीत करण्यात आलेल्या ९७० भूखंडाची विक्री आतापर्यंत प्रशासनाद्वारा करण्यात आलेली आहे. याद्वारे प्राप्त रक्कम त्याच भागाच्या विकासासाठी करण्यात आल्याचे प्रशासनाद्वारा सांगण्यात आले.

प्रशासनाकडे आकोली १३६, पेठ अमरावती ७९, वडाळी १९, निंभोरा २२, जेवड ६२, वरुडा ३३, गंभीरपुरा १२, महाजनपुरा २३, वडद ०६, बडनेरा १८८, नवसारी २०४, शेगाव १०५, रहाटगाव १८५, म्हसला १४०, तारखेडा १७, बेनोेडा ८९ याशिवाय आयडीएसएमटीत २२४ भूखंड महापालिकेला विकास शुल्कासाठी हस्तांतरित करण्यात आले आहेत. यापैकी ९७० भूखंडाची विक्री करण्यात आलेली आहे. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेकरिता २३० भूखंडाचा वापर करण्यात आलेला आहे. अजूनही ३०४ भूखंड महापालिकेजवळ आहेत. यामध्ये अनेक भूखंडाच्या किमती वाढल्याने त्याचा अधिक मोबदला मिळाल्यास त्या ले-आऊटचा अधिक विकास करणे शक्य होणार आहे.

Web Title: Sale of 970 plots transferred by Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.