अमरावती जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांतील कँटिनमध्ये करावी लागणार हेल्दी फूडची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 01:46 PM2019-06-22T13:46:51+5:302019-06-22T13:48:10+5:30

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयांतील कँटिनमध्ये जंक फूडऐवजी पोषक पदार्थांची विक्री करण्याबाबत जिल्ह्यातील २८०० शाळांना अन्न न औषध प्रशासनाच्यावतीने पत्र देण्यात आले आहे.

Sale of healthy food in Canteen of school and college in Amravati district | अमरावती जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांतील कँटिनमध्ये करावी लागणार हेल्दी फूडची विक्री

अमरावती जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांतील कँटिनमध्ये करावी लागणार हेल्दी फूडची विक्री

Next
ठळक मुद्दे२८०० शाळांना पत्रएफडीएच्या आयुक्तांचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
संदीप मानकर
अमरावती : विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयांतील कँटिनमध्ये जंक फूडऐवजी पोषक पदार्थांची विक्री करण्याबाबत जिल्ह्यातील २८०० शाळांनाअन्न न औषध प्रशासनाच्यावतीने पत्र देण्यात आले आहे. एफडीएच्या राज्य आयुक्त पल्लवी दराडे यांनी काढलेल्या परिपत्रकानंतर हे पाऊल उचलले गेले. शाळा सुरू झाल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी यासंदर्भात तेथे कार्यशाळा घेणार असल्याची माहिती सहआयुक्त (अन्न) सुरेश अन्नपुरे यांनी दिली.
शाळा-महाविद्यालयांच्या कँटिनमध्ये कचोरी, समोसा, चिप्स किंवा तेलकट खाद्यपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात करण्यात येते. जिभेचे चोचले पुरविण्याकरिता विद्यार्थी असे पदार्थ आवडीने सेवन करतात. यामुळे विद्यार्थांना वजन वाढणे, उच्च रक्तदाप किंवा डायबिटीजसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. ही बाब गंभीर असल्याने विद्यार्थ्यांना पोषक, आरोग्याला पूरक असलेले पदार्थ मिळावे म्हणून एफडीएने पुढाकार घेतला आहे. एफडीएच्या आयुक्त पल्लवी दराडे यांच्या आदेशानुसार अमरावती एफडीएचे अधिकारी कामाला लागले असून, जिल्हा परिषद, नगरपालिका, कॉन्व्हेंट, अनुदानित, विनाअनुदानित व अंशत: अनुदानित अशा सर्व शाळांना मार्गदर्शक सूचनांचे पत्र पाठविले आहे. यासंदर्भात आहारतज्ज्ञ व तज्ज्ञ डॉक्टरांकडून सूचना मागविल्याचे सहायक आयुक्त (अन्न) सचिन केदारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अन्न सुरक्षा अधिकारी त्यांच्या क्षेत्रातील शाळेत मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थी, पालक, शिक्षक व कँटिनचालकांची यावेळी कार्यशाळा घेतली जाईल.

विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. एफडीए आयुक्तांंच्या आदेशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
- सुरेश अन्नपुरे, सहआयुक्त, अन्न व प्रशासन विभाग, अमरावती

Web Title: Sale of healthy food in Canteen of school and college in Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.