वरूडमधे चढ्या दराने दारू विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:10 AM2021-05-28T04:10:20+5:302021-05-28T04:10:20+5:30

होम डिलिव्हरी कागदावरच : प्रशासनाचे दुर्लक्ष वरूड : राज्यात कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन सुरू असताना मद्यविक्रीला शासनाने अटी, ...

Sale of liquor at an ascending rate in Warud | वरूडमधे चढ्या दराने दारू विक्री

वरूडमधे चढ्या दराने दारू विक्री

Next

होम डिलिव्हरी कागदावरच : प्रशासनाचे दुर्लक्ष

वरूड : राज्यात कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन सुरू असताना मद्यविक्रीला शासनाने अटी, शर्तीवर परवानगी दिली. यामध्ये होम डिलिव्हरी आणि एमआरपीमध्येच विक्री करणे बंधनकारक आहे. मात्र, तालुक्यात बेभाव दारूविक्री सुरू असून, होम डिलिव्हरी कागदावरच आहे.

दारू विक्रेते १५० रुपयांची बॉटल २०० ते २५० रुपये, तर १८० रुपयांची दारू २५० रुपयांत बारसमोर विकत आहेत. याकडे राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. ग्राहकांना शेकडो रुपयांचा फटका बसत असल्याची ओरड तळीरामांमध्ये आहे. यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली जात आहे.

कोट

बारमधून मद्य विक्री करता येत नाही. होम डिलिव्हवरीला परवानगी आहे. एमआरपीपेक्षा अधिक रक्कम घेतली जात असेल, तर चौकशी करू.

कुंदन कुमरे, राज्य उत्पादन शुल्क विभाग

Web Title: Sale of liquor at an ascending rate in Warud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.