नांदगावातील लिंबाची मध्यप्रदेशात विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:12 AM2021-04-14T04:12:10+5:302021-04-14T04:12:10+5:30
फोटो - १२ एस नांदगाव खंडेश्वर नांदगाव खंडेश्वर : लिंबाचे भाव वधारल्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यात उत्पादित माल मध्य प्रदेशातील ...
फोटो - १२ एस नांदगाव खंडेश्वर
नांदगाव खंडेश्वर : लिंबाचे भाव वधारल्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यात उत्पादित माल मध्य प्रदेशातील जबलपूर व भोपाळ येथे विक्रीसाठी व्यापाऱ्यांकडून नेला जात आहे. गतवर्षी नुकसान झेलणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
उन्हाळ्यात लिंबाची मागणी वाढत असल्याने शेतकऱ्यांना चांगले भाव मिळतात. पण, गतवर्षी लॉकडाऊनमुळे कित्येक बगीचांची लिंबं झाडालाच लागून होती. तोडला न गेल्याने झाडावरील हा माल जमिनीवर गळून पडला व मातीमोल झाला. मालाला बाजारपेठ व मागणीही नव्हती. यंदा मात्र अद्याप चांगले चित्र असून, भाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. जबलपूर येथील बाजारात ६० ते ६५ रुपये किलो दराने लिंबाची विक्री होत आहे.
------------
माहुली चोर शिवारात एक हजार लिंबाची झाडे आहेत. पीक चांगले बहरले आहे. बाहेरराज्यात लिंबाला भावही चांगले आहे. पण, लॉकडाऊन लागले, तर भावात फरक पडण्याची भीती आहे.
- अंकुश झंझाट, शेतकरी, माहुली चोर.