उघड्यावरील मांस विक्रीे श्वानांना करताहेत आकर्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 01:36 AM2019-08-15T01:36:27+5:302019-08-15T01:37:00+5:30

शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेली उघड्यावरील मांस विक्री श्वानांना आकर्षित करीत आहे. मांस खाण्यासाठी श्वान झुंबड करीत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मांस खाणाऱ्या श्वानांमध्ये शिकारी वृत्ती वाढत असल्याचे प्राणीप्रेमींनी स्पष्ट केले.

The sale of open meat appeals to dogs | उघड्यावरील मांस विक्रीे श्वानांना करताहेत आकर्षित

उघड्यावरील मांस विक्रीे श्वानांना करताहेत आकर्षित

Next
ठळक मुद्देरोगराईला बळ : नियंत्रणाकरिता प्रशासनाने ठोस पाऊल उचलण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेली उघड्यावरील मांस विक्री श्वानांना आकर्षित करीत आहे. मांस खाण्यासाठी श्वान झुंबड करीत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मांस खाणाऱ्या श्वानांमध्ये शिकारी वृत्ती वाढत असल्याचे प्राणीप्रेमींनी स्पष्ट केले. मांसातील विषाणुंमुळे श्वान आजारी पडत असल्याचेही निदर्शनास येत आहे.
उघड्यावर मांस कापणे हे कायद्याने गुन्हा ठरते, मात्र अमरावती शहरात सर्रास उघड्यावर मांस कापून विक्री केली जात आहे. मांस खाणे खवय्यांचीही गर्दी या प्रतिष्ठानावर वाढत आहे. मात्र ते मांस खाण्यायोग्य आहे किंवा नाही, याची तपासणी कोणतीही यंत्रणा करीत नाही. त्यामुळे मांस खाण्यामुळे रोगराई पसरण्याचीही भीती निर्माण झाली आहे. त्यातच उघड्यावर मांस विक्री करणारे व्यवसायिक मांसाचा निरुपयोगी भाग एखाद्या कचरा कुंडीत टाकतात किंवा नाल्यात फेकतात. बडनेरानजीक जुन्या वस्तीत, शुक्रवार बाजारानजीक आशियाना क्लबजवळ, खोलापुरी गेटसमोर, लोणटेक मार्ग, न्यू कृष्णार्पण कॉलनी चौकातील मार्ग आदी ठिकाणी उघड्यावर मांसविक्रीची दुकाने थाटून आतड्यासह वेस्टेड फेकले जात असल्याचे आढळून येत आहे. याच भागात श्वानांची गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे उघड्यावरील मांस विक्रीबद्दल प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

श्वान अपघाताच्या घटनांत वाढ
वेस्टेज मांस फेकताच त्यावर ताव मारण्याकरिता श्वान तुटून पडतात. अशात रस्ता अपघातात श्वानांचा बळी जात आहे. जखमी अवस्थेत उपचाराअभावी बहुतांश श्वान दगावण्याच्या घटना घडतात. पंचवटी ते गॅलक्सी बारदरम्यान वाहनाच्या धडकेत श्वान गंभीर जखमी झाला. वसा संस्थेचे प्राणीप्रेमी गणेश अकर्ते निखिल फुटाणे यांनी त्याला वैद्यकीय मदत पुरविली.
श्वान पडत आहेत आजारी
मांसातील विषाणूमुळे श्वानांना पोटाचे विकार होतात. पातळ हगवण लागणे हे या रोगाचे मुख्य कारण आहे. मांस विक्रेते कोंबड्यांचे आतडे रस्त्याच्या कडेला फेकतात. ते खाण्यासाठी श्वानांची झुंबड उडते. कच्चे मांस खाल्ल्यामुळे श्वानांमधील शिकारी वृत्ती वाढत असून, त्यांच्यात रोगराई पसरण्याची भीती असल्याचे प्राणीप्रेमींचे मत आहे.

Web Title: The sale of open meat appeals to dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य