ऑगस्ट महिन्यात कार, दुचाकींच्या विक्रीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:14 AM2021-09-26T04:14:28+5:302021-09-26T04:14:28+5:30
अमरावती : कोरोना काळात कार, दुचाकी विक्री थांबली होती. मात्र, अनलॉकमध्ये खासगी प्रवास करण्यास कुठलेही अडथळा निर्माण होऊ नये, ...
अमरावती : कोरोना काळात कार, दुचाकी विक्री थांबली होती. मात्र, अनलॉकमध्ये खासगी प्रवास करण्यास कुठलेही अडथळा निर्माण होऊ नये, म्हणून नागरिकांनी नवीन कार-दुचाकी खरेदीकडे धाव घेतली आहे. ऑगस्ट महिन्यात तब्बल ४८० कार, तर २६९३ दुचाकींची अमरावतीकरांनी खरेदी केली. या नवीन वाहनांची नोंद आरटीओकडे झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तसेच शेतीचे कामे लागल्याने १८५ नवीन ट्रक्टरचीसुद्धा प्रगतिशील शेतकऱ्यांनी खरेदी केली आहे. त्याचप्रमाणे नवीन २९ रुग्णवाहिका जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. त्याची नोंदसुद्धा आरटीओकडे झाली. कोरोनाकाळात कडक लॉकडाऊनमध्ये शो-रुम बंद होते. त्यानंतर फारशी प्रवासी वाहतूकही नव्हती. त्यामुळे नागरिकांना हाल सहन करावे लागले. मात्र, आता काही महिन्यांपासून परिस्थिती पूर्ववत झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे वाहतूक वाढली असून, आपल्या परिवाराची गैरसोय होऊ नये, याकरिता कार खरेदी केल्याची माहिती एकाने दिली.