वरुडच्या संत्र्यांची विक्री बंगळुरूच्या मॉलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 09:55 PM2017-11-06T21:55:11+5:302017-11-06T21:55:28+5:30

थेट मार्केटिंग व विक्रीच्या पर्यायातून अधिक नफा मिळविण्यात वरुड येथील श्रमजिवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनी यशस्वी झाली आहे.

Sales of Varud's oranges in the Bangalore mall | वरुडच्या संत्र्यांची विक्री बंगळुरूच्या मॉलमध्ये

वरुडच्या संत्र्यांची विक्री बंगळुरूच्या मॉलमध्ये

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांचा पुढाकार : उत्पादक ते थेट ग्राहक ही उपलब्धी

लोकमत न्यूज नेटवर्क
वरुड : थेट मार्केटिंग व विक्रीच्या पर्यायातून अधिक नफा मिळविण्यात वरुड येथील श्रमजिवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनी यशस्वी झाली आहे. कंपनीच्या माध्यमातून या भागातील शेतकºयांचा संत्रा थेट बंगळुरू येथील मॉलमध्ये पाठविला जातो. त्या माध्यमातून ७ ते ८ हजार रुपये प्रतिटन अतिरिक्त पदरी पडले.
शेतकºयांच्या शेतमालाला थेट विक्रीचा पर्याय उपलब्ध व्हावा, याकरिता जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, प्रकल्प संचालक अंबादास मिसाळ खरेदीदार व विक्रेता चर्चासत्र आयोजित केले होते. त्या सभेत पंकज दंडाळे, गणेश कोठे, धनंजय लोडम व विविध क्षेत्रात काम करणाºया कंपन्यांनी सहभाग घेतला. चर्चाच्या अनुषंगाने फ्यूचर रिटेल कंपनीसोबत श्रमजिवी संत्रा उत्पादक कंपनीचे अध्यक्ष नीलेश मगर्दे व रमेश जिचकारा यांनी सामजंस करार करून ६५ मिमी आकाराच्या संत्राफळाचा ८ मे. टन पुरवठा बिग बाजार फ्यूचर रिटेल बंगळुरू येथे रुपये ५२ प्रति किलो पोहोच खर्च वजा जाऊन रुपये ७ ते ८ हजार प्रति टनप्रमाणे अधिक रक्कम शेतकºयांना प्राप्त झाली.

प्रक्रिया उद्योगाअभावी संत्रा उत्पादक मागे पडले आहेत. जिल्हाधिकाºयांनी पुढाकार घेत संत्रा उत्पादकांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. उत्पादकांना याचा थेट लाभ मिळेल.
- रमेश जिचकार,
श्रमजीवी संत्रा उत्पादक कंपनी

Web Title: Sales of Varud's oranges in the Bangalore mall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.