स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्यातून शहिदांना मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:16 AM2021-08-29T04:16:13+5:302021-08-29T04:16:13+5:30
केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालय, लोकसंपर्क ब्युरो (पुणे) व क्षेत्रीय कार्यालय (अमरावती) आणि माता सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय कला ...
केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालय, लोकसंपर्क ब्युरो (पुणे) व क्षेत्रीय कार्यालय (अमरावती) आणि माता सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय कला व क्रीडा मंडळ (ता. अकोट) यांच्यावतीने २८ ऑगस्ट रोजी अमरावती येथील इर्विन चौकात स्वातंत्र्यासाठी लढलेल्या वीरांना गीत-संगीतातून मानवंदना देण्यात आली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतून ठिकठिकाणी साजरा होत आहे. यात टीम लीडर भीमराव तायडे व संचाने सहभाग दिला. संतोष दोनोदर यांनी गायिकेची भूमिका केली. ढोलकीवर जगन्नाथ तायडे, हार्मोनियमवर संघपाल दोनोदर, टाळवादन गुणवंत बांगर, सूत्रसंचालन शीलरत्न अंदुरकर यांनी केले. तेजराव वाकोडे कोरस गायक, तर मीना तायडे या सहकलाकार आहेत. त्यांच्या अस्सल मातीतील संगीताने रस्त्यावरील नागरिकांचे लक्ष वेधले होते. (छाया - मनीष तसरे, अमरावती)