इंधन दरवाढी विरोधात समाजवादी पार्टीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:10 AM2021-06-18T04:10:09+5:302021-06-18T04:10:09+5:30
महागाई रोखण्याची मागणी मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी अमरावती: गत काही महिन्यापासून पेट्रोल व डिझेल तसेच गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये ...
महागाई रोखण्याची मागणी मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी
अमरावती: गत काही महिन्यापासून पेट्रोल व डिझेल तसेच गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे.त्यामुळे सर्वसामान्याना जगणे कठीण झाले आहे.वाढती महागाई रोखण्यात केंद्रातील मोदी सरकार अपयशी ठरले आहे.यामुळे माेदी सरकारच्या जनहित विरोधी धोरणाचा निषेध करत गुरूवारी समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हाकचेरीवर धडक दिली.यावेळी भाजप सरकार विरोधात रोष व्यक्त केला.
केंद्र सरकारने पेट्रोल,डिझेल व गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढविल्या आहेत.पेट्रोल १०४ रूपयाचा टप्पा पार केला आहे.तर डिझेलही ९२ रूपये लिटरवर जावून पोहोचले आहे.स्वयंपाकाचा गॅस ९०० रूपयावर गेला आहे.केंद्र सरकार मात्र पेट्रोल,डिझेल मधून कराच्या रूपाने कोटयावधी रूपयाचा नफा घेत असून सामान्य जनेतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले आहे.त्यामुळे मोदी सरकारचा तीव्र निषेध करत समाजवादी पार्टीचे संपाप व्यक्त केला.यावेळी वाढती महागाई रोखण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांचे मार्फत केंद्र सरकारला पाठविण्यात आले.यावेळी आंदोलनात समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सलीम जावेद खान,उपाध्यक्ष मोहम्मद जाकीर,तन्वीर मिर्झा,मोहन टाले,अब्दुल रझिक,शेख नौशाद,जकी नसीम,संजाची मोसीन खान,जाकीर हूसेन,सय्यद अमिर,शाकीर खान,सालिमोद्दीन,मोहम्मद नासिर व पदाधिकारी सहभागी झाले होते.