येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी प्रवास सुरू होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

By मोरेश्वर येरम | Published: December 5, 2020 02:51 PM2020-12-05T14:51:55+5:302020-12-05T14:53:19+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली.

samruddhi highway work inspection by cm uddhav thackeray | येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी प्रवास सुरू होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी प्रवास सुरू होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

googlenewsNext
ठळक मुद्देसमृद्धी महामार्गाच्या कामाचं मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुकमहाराष्ट्राला अभिमान वाटेल असा महामार्ग होणार, मुख्यमंत्र्यांचा दावायेत्या १ मेपर्यंत नागपूर-शिर्डी प्रवास समृद्धी महामार्गावरुन सुरू होणार

अमरावती
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी प्रवास सुरू होईल, अशी मोठी घोषणा केली आहे. समृद्धी महामार्गाचं काम पूर्ण होईल तेव्हा तो सर्वोत्तम महामार्ग असेल, निश्चितच महाराष्ट्राला याचा अभिमान वाटेल, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी महामार्गाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केलं. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. "आज पहिल्यांदाच मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे महामार्ग प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पाचे काम अप्रतिम चालू आहे. प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा ज्याचा महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा आपल्या देशातील सर्वोत्तम महामार्ग बनेल, असं आपण काम केलेलं असेल", असं उद्धव ठाकरे म्हणाले.

१ मेपर्यंत नागपूर ते शिर्डी प्रवास सुरू होणार
समृद्धी महामार्गावरुन येत्या १ मेपर्यंत नागपूर ते शिर्डी प्रवास सुरू होणार असल्याचीही माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, "आपण हे काम ज्या गतीने करतो आहे. लॉकडाउनच्या काळात असं वाटलं होतं की कामात खंड पडेल किंबहुना काम थोडसं हळुवारपणे होईल पण त्या काळात सुद्धा प्रकल्पाचं काम मंदावलेलं नाही. मला खात्री आहे. येत्या १ मे पर्यंत आपण नागपूर ते शिर्डी प्रवास या रस्त्यावरुन करू शकू"

मुंबईपर्यंतचंही काम लवकर होईल
येत्या १ मेपर्यंत नागपूर ते शिर्डी प्रवास समृद्धी मार्गावरुन सुरू झाल्यानंतर पुढच्या १ मेपर्यंत आपण मुंबईपर्यंत पोहोचलेले असू, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 

Read in English

Web Title: samruddhi highway work inspection by cm uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.