संचारबंदीतही समृद्धी महामार्गाचे काम सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 05:00 AM2020-04-13T05:00:00+5:302020-04-13T05:00:56+5:30

नांदगाव खंडेश्वर येथे भाड्याने वास्तव्यास असलेल्या आणि समृद्धी महामार्गाच्या कामावरील काही मजुरांची रोज सकाळी लगबग दिसून येते. संचारबंदीमुळे प्रत्येक जण आपापल्या घरात असताना ती लगबग कशासाठी? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, समृद्धी महामार्गाच्या सेलू नजीक कामावर ते दररोज जात असल्याचे निदर्शनात आले. देशभरात लॉकडाऊन आणि नागरिकांकरिता बंदीचे आदेश असताना सोशल डिस्टन्सिंग न पाळता हे मजूर कंत्राटदाराच्या हाताखाली राबत आहेत.

The Samruddhi highway work is smooth even in communication | संचारबंदीतही समृद्धी महामार्गाचे काम सुसाट

संचारबंदीतही समृद्धी महामार्गाचे काम सुसाट

googlenewsNext
ठळक मुद्देसंसर्गाची भीती : कुठे आहे लॉकडाऊन, शेलू गावाजवळ गुपचूप सुरू आहे काम

अमोध धवसे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : कोरोना व्हायरसने जगभरात १ लाख ९ हजार बळी घेतले. देशात ८३०० पेक्षा अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली. राज्यातील कोरोनाबळींची संख्या १२७ वर पोहोचली. त्यामुळे लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला. संचारबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस, महसूल यंत्रणा रस्त्यावर उतरली असताना येथून १० किलोमीटर अंतरावर शेलू गावानजीक कुणाच्याही लक्षात येणार नाही, अशा ठिकाणी समृद्धी महामार्गाचे काँक्रिटीकरण व पुलाचे बांधकाम सुरू आहे. तेथे सुमारे १५० परप्रांतीय मजूर राबत असल्याचे रविवारी निदर्शनास आले.
नांदगाव खंडेश्वर येथे भाड्याने वास्तव्यास असलेल्या आणि समृद्धी महामार्गाच्या कामावरील काही मजुरांची रोज सकाळी लगबग दिसून येते. संचारबंदीमुळे प्रत्येक जण आपापल्या घरात असताना ती लगबग कशासाठी? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, समृद्धी महामार्गाच्या सेलू नजीक कामावर ते दररोज जात असल्याचे निदर्शनात आले. देशभरात लॉकडाऊन आणि नागरिकांकरिता बंदीचे आदेश असताना सोशल डिस्टन्सिंग न पाळता हे मजूर कंत्राटदाराच्या हाताखाली राबत आहेत. तीन दिवसांपासून हे काम सुरू असल्याचे काही मजुरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सदर कंत्राटदाराच्या प्रतिनिधीला विचारणा केली असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. नांदगाव खंडेश्वर येथे वास्तव्य आणि तेथून दररोज ये-जा करीत असलेल्या या परप्रांतीय मजुरांना कोरोना विषाणूची लागण झाल्यास हे शहर हॉटस्पॉट बनण्याची भीती व्यक्त होत आहे.

तहसीलस्तरावरून परवानगीबाबत कुठलीही प्रकिया वा पत्रव्यवहार झाला नाही. काम सुरू ठेवण्याबाबत संबंधित कंत्राटदाराने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी मिळविली आहे.
- पी.झेड. भोसले, तहसीलदार, नांदगाव खंडेश्वर

समृध्दी महामार्गाचे ते काम थांबविण्यात यावे. कामावरील परप्रांतीय मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात यावी. अन्यथा शहराला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
- अक्षय पारस्कर,
माजी नगराध्यक्ष,
नांदगाव खंडेश्वर

Web Title: The Samruddhi highway work is smooth even in communication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.