सहा महिन्यांत समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:13 AM2020-12-06T04:13:11+5:302020-12-06T04:13:11+5:30

फोटो पी ठाकरे फोल्डर नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा देशातील सर्वोत्तम महामार्ग ...

Samrudhi Highway open for traffic in six months | सहा महिन्यांत समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला

सहा महिन्यांत समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला

Next

फोटो पी ठाकरे फोल्डर

नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरेल. या महामार्गाची कामे गतीने होत असून, येत्या सहा महिन्यांत शिर्डीपर्यंत हा मार्ग खुला होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी शनिवारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापूरनजीक समृद्धी महामार्गाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, वनमंत्री संजय राठोड, माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार वीरेंद्र जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, सचिव अनिल गायकवाड, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. आदी उपस्थित होते.

नागपूर- मुंबई शीघ्र संचार द्रुतगती महामार्गाची अमरावती जिल्ह्यातील लांबी सुमारे ७४ कि. मी. असून, मुख्यमंत्र्यांनी पूर्ण झालेल्या कामाची सहा किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करून पाहणी केली. समृद्धी महामार्गाची कामे लॉकडाऊन काळातही सुरू होती. त्यामुळे बरेचसे काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डीपर्यंत येत्या १ मेपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. त्यानंतर पुढील वर्षात संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण होऊन वाहतूक मुंबईपर्यंत सुरळीत होईल. प्रकल्प संचालक संगीता जैस्वाल यांनी प्रास्ताविक केले.

बॉक्स

समृद्धी महामार्गावर उतरले मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापूरनजीक समृद्धी महामार्गावर तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर सकाळी ११.३० च्या सुमारास मुख्यमंत्री ठाकरे यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

फोटो ०५एएमपीएच०९ - प्रकल्प संचालक संगीता जैस्वाल यांच्याकडून महामार्गाची माहिती जाणून घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ना. यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप.

०५एएमपीएच१० - मुख्यमंत्र्यांच्या स्वागतार्थ पुष्पगुच्छ घेऊन ना. संजय राठोड, ना. यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप.

०५एएमपीएच११ - ना. यशोमती ठाकूर यांच्याद्वारा समृद्धी महामार्गावरून माहिती जाणून घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

Web Title: Samrudhi Highway open for traffic in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.