सहा महिन्यांत समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:13 AM2020-12-06T04:13:22+5:302020-12-06T04:13:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरेल. ...

Samrudhi Highway open for traffic in six months | सहा महिन्यांत समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला

सहा महिन्यांत समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरेल. या महामार्गाची कामे गतीने होत असून, येत्या सहा महिन्यांत शिर्डीपर्यंत हा मार्ग खुला होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी शनिवारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापूरनजीक समृद्धी महामार्गाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, वनमंत्री संजय राठोड, आदी उपस्थित होते.

नागपूर- मुंबई द्रुतगती महामार्गाची अमरावती जिल्ह्यातील लांबी सुमारे ७४ कि. मी. असून, मुख्यमंत्र्यांनी पूर्ण झालेल्या कामाची सहा किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करून पाहणी केली. समृद्धी महामार्गाची कामे लॉकडाऊन काळातही सुरू होती. पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डीपर्यंत येत्या १ मेपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. त्यानंतर पुढील वर्षात संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण होऊन वाहतूक मुंबईपर्यंत सुरळीत होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

.................................

समृद्धी महामार्गावर उतरले मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापूरनजीक समृद्धी महामार्गावर तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर सकाळी ११.३० च्या सुमारास मुख्यमंत्री ठाकरे यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले.

Web Title: Samrudhi Highway open for traffic in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.