रस्त्यावर सांडलेली रेती, गिट्टी हटविण्यात आली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:13 AM2021-05-25T04:13:22+5:302021-05-25T04:13:22+5:30

बडनेरा : ओव्हरलोड ट्रकमधील रेती व गिट्टी रस्त्यावर सांडल्याने अन्य वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता. सदर वृत्त लोकमतने ...

Sand, ballast spilled on the road was removed | रस्त्यावर सांडलेली रेती, गिट्टी हटविण्यात आली

रस्त्यावर सांडलेली रेती, गिट्टी हटविण्यात आली

Next

बडनेरा : ओव्हरलोड ट्रकमधील रेती व गिट्टी रस्त्यावर सांडल्याने अन्य वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता. सदर वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यावर तात्काळ त्याची दखल घेऊन सोमवारी सकाळी रस्त्यावर सांडलेली रेती, गिट्टी झाडून रस्ता साफ करण्यात आला. मात्र, बेफिकिरीने चालविणाऱ्या अशा वाहनांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

ओव्हरलोड ट्रकमधील रेती, गिट्टी रस्त्यांवर, या शीर्षकाने लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर सांडलेली रेती व गिट्टी हटविण्यात आली. पोलीस ठाण्यासमोरून जाणाऱ्या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात बराच दूरपर्यंत रेती व गिट्टी सांडली होती. अनेक वाहने घसरूनदेखील पडली. सुरळीत वाहनचालकांना याचा मनस्ताप सहन करावा लागला. ओव्हरलोड व भरधाव धावणाऱ्या अशा वाहनांवर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे. संचारबंदीमुळे सध्या रस्त्यांवर फारशी गर्दी नाही. मात्र, गर्दीत सदर बाब जीवघेणी ठरू शकली असती, निष्काळजीपणे स्पिड ब्रेकरवरून भरधाव वाहनांना अटकाव घातला पाहिजे, अन्यथा नाहक दुर्घटनेची शक्यता नाकारता येणार नाही. बडनेरा शहरात मोठ्या प्रमाणात रेती, गिट्टी, मुरूम वाहून नेणारे ट्रक धावतात. वाहतुकीच्या नियमांचे पालनदेखील करीत नाही. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. रस्त्यावर रेती, गिट्टी सांडण्याचा हा पहिलाच प्रकार नाही. अनेकदा स्पीड ब्रेकरच्या ठिकाणी रेती व गिट्टी सांडलेली असते. यावर संबंधित विभागाने नियंत्रण आणणे गरजेचे आहे.

Web Title: Sand, ballast spilled on the road was removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.