वाळू चोरटे ट्रॅक्टरसह पळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 09:55 PM2018-11-04T21:55:07+5:302018-11-04T21:55:54+5:30
वाळूने भरलेले ट्रॅक्टर न थांबविता वाळूचोरट्यांनी पळ काढल्याच्या दोन घटना तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर येथे २६ व ३० आॅक्टोबर रोजी घडल्यात. याप्रकरणी तलाठ्याच्या तक्रारीवरुन मारडा व कौंडण्यापूर येथील दोन ट्रॅक्टर चालकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वाळूने भरलेले ट्रॅक्टर न थांबविता वाळूचोरट्यांनी पळ काढल्याच्या दोन घटना तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर येथे २६ व ३० आॅक्टोबर रोजी घडल्यात. याप्रकरणी तलाठ्याच्या तक्रारीवरुन मारडा व कौंडण्यापूर येथील दोन ट्रॅक्टर चालकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२६ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० च्या तलाठी रामप्रसाद आडमाची व कोतवाल प्रवीण दोंडगे यांना रुख्मिणी विदर्भ संस्थान यांच्या मालकी शेतीला लागून वाळू चोरी सुरु असल्याचे लक्षात आले. एक ब्रास वाळू असलेला ट्रक्टर त्यांना दिसून आल्याने दोघांनीही त्या ट्रॅक्टरचालकास थांबवण्यिाची सूचना केली. मात्र, चालकाने ट्रॅक्टर न थांबविता कॅनालच्या दिशेने कच्च्या रस्त्याने पळविला. त्यानंतर तलाठी व कोतवालांनी पाठलाग केला. मात्र, धुळीमुळे ते त्यांच्यापर्यत पोहोचू शकले नाही. ४ लाखाचा ट्रॅक्टर व सुमारे ६ हजार रुपयांची वाळू घेऊन ते पोबारा झाले. त्या वाहनाची गावात चौकशी केली असता ते वाहन चंदू गजानन ठाकरे यांच्या मालकीचे असल्याचे निदर्शनास आले. तलाठी रामप्रसाद आडमाची यांनी कुºहा पोलिसात चंदू ठाकरे यांच्या विरुध्द तक्रार नोंदविली. पोलिसांनी कलम ३७९, व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला. तर दुसरी घटना कौंडण्यपूर येथे ३० आॅक्टोबर रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. तलाठी एस. बी. कळस्कर व कोतवाल प्रवीण दोंडगे यांनी कौंडण्यापूर येथील इ-क्लास जमिनीला भेट दिली असता तेथे त्यांना वाळूची चोरी होत असल्याचे लक्षात आले. एम.एच. २७ एल. ७७२५ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून ही वाळूचोरी होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी वाहनचालकास थांबविले. त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचा वैध परवाना आहे की नाही, याबाबत तपासणी केली. मात्र, वाहनचालकाकडे वैध परवाना नसल्याने ट्रॅक्टर तिवसा तहसील कार्यालयात नेऊन चालानबाबत त्यास सूचना करण्यात आली. मात्र, चालक प्रवीण बडकसने ट्रॅक्टर पळवून नेला. याप्रकरणी कुऱ्हा पोलिसांनी रामप्रसाद आडमाची यांच्या तक्रारीवरुन आरोपी वाहन चालक प्रवीण ओंकारराव बडकस (मारडा) याचेविरुध्द विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. तिवसा परिसरात वाळू तस्करीला उधाण आल्याचे चित्र आहे.