रेती तस्कर आसेगाव पोलिसांच्या जाळ्यात

By admin | Published: June 21, 2017 12:16 AM2017-06-21T00:16:00+5:302017-06-21T00:16:00+5:30

खोट्या रॉयल्टी पासवर अवैध रेती चोरून नेणाऱ्या तीन ट्रॅक्टरचालकांना व घाटमालकांसह अन्य एक अशा पाच जणांना आसेगाव पोलिसांनी रंगेहाथ पकडून २० लाखांच्या मुद्देमालासह अटक केली आहे.

Sand Taskar Asegaon police trap | रेती तस्कर आसेगाव पोलिसांच्या जाळ्यात

रेती तस्कर आसेगाव पोलिसांच्या जाळ्यात

Next

घाटमालकासह ५ अटकेत : खोट्या रॉयल्टी पासवर रेतीची चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव पूर्णा, चांदूरबाजार : खोट्या रॉयल्टी पासवर अवैध रेती चोरून नेणाऱ्या तीन ट्रॅक्टरचालकांना व घाटमालकांसह अन्य एक अशा पाच जणांना आसेगाव पोलिसांनी रंगेहाथ पकडून २० लाखांच्या मुद्देमालासह अटक केली आहे.
आसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळणी तामसवाडी येथून पूर्णा नदीचे रेतीघाटातून अवैधरीत्या रेतीची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्याआधारे आसेगाव पोलिसांनी ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ जून रोजी दिवसा सापळा रचून तळणी तामसवाडी फाट्यावरून रेतीने भरलेले तीन ट्रॅक्टर पकडून त्याचे चालक मनोज बन्सी दहेकर (२३), अन्सार खाँ अब्बास खाँ (३३) दोघेही रा. मोमीनपुरा, अचलपूर व आदित्य प्रकाश माहोरे (२२, तामसवाडी) यांना अटक करून त्यांच्याकडून ट्रॅक्टरसह अंदाजे २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
खोट्या रॉयल्टी पासेस दाखवून शासनाची दिशाभूल करणाऱ्या मौजे गोपाळपूर येथील पेढीनदी रेतीघाटाचा मालक राजेश भोंगे व त्यांचा नौकर काझी आसिफ उद्दीन (२७) या दोघांना नंतर अटक केली. पोलिसांनी जप्त केलेल्या ट्रॅक्टरमध्ये एमएच २७ बीडी २४१७, एमएच २७ एम ८२५० व एमएच २९ एडी ९९६० या तीन ट्रॅक्टरचा समावेश आहे.

Web Title: Sand Taskar Asegaon police trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.