डंपरमध्ये क्षमतेच्या दुप्पट रेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 05:00 AM2020-11-08T05:00:00+5:302020-11-08T05:00:53+5:30
पोलिसी कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्या १३ ते १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. ते सर्व जण पसार झाले आहेत. शेंदूरजनाघाट पोलिसांचे एक पथक आरोपींच्या शोधात रवाना झाले आहे, तर बांधकाम विभागाच्या मोजमापामध्ये दुप्पट ते अडीच पट क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहतूक डम्परमधून केली जात असल्याचे उघड झाल्याने दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक दंड वसूल होणार आहे, तर परिवहन विभागाकडून वेगळा दंड वसूल होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : येथील ठाणेदार तथा आयपीएस अधिकारी श्रेणिक लोढा यांनी रेतीचे ३५ डंपर जप्त केले. त्या जप्त डंपरमधील रेतीचे मोजमाप करण्यात आले. काही डंपरमध्ये दुप्पट व काही डंपरमध्ये अडीच पट रेती असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, आरटीओ तपासणी नाक्याला अव्हेरून ओव्हरलोड डंपर चालतात तरी कसे, या अनुषंगाने पोलिसांनी चौकशी आरंभली आहे.
पोलिसी कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्या १३ ते १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. ते सर्व जण पसार झाले आहेत. शेंदूरजनाघाट पोलिसांचे एक पथक आरोपींच्या शोधात रवाना झाले आहे, तर बांधकाम विभागाच्या मोजमापामध्ये दुप्पट ते अडीच पट क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहतूक डम्परमधून केली जात असल्याचे उघड झाल्याने दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक दंड वसूल होणार आहे, तर परिवहन विभागाकडून वेगळा दंड वसूल होणार आहे.
दरम्यान, नद्यांची चाळण करणाऱ्या या व्यावसायिकांबाबत पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रेती तस्करांचे आंदोलन
रेती तस्करांनी गत महिन्यात पांढुर्णा चौकात आंदोलन करून पोलीस आणि महसूल प्रशासनाला वेठीस धरले होते. डंपर फायनान्स कंपनीकडून कर्जावर घेतल्याने कर्जाचे हप्ते भरावे कसे, हा प्रश्न असल्याने रेतीची विनाशर्त वाहतूक सुरू करा, या मागणीकरिता त्यांनी वाहतूक अडविली होती, हे विशेष. जिल्हाधिकाऱ्यांनी रेतीचे दर निश्चित करून द्यावेत, अशी मागणी तालुक्यातील नागरिक तसेच बांधकाम व्यावसायिकांनी केली आहे.
अवैध धंदे, रेती तस्करी, अवैध वाहतुकीला आळा घालण्याकरिता गुन्हेगारांचे मुसके आवळू. नागरिकांचेसुद्धा सहकार्य अपेक्षित आहे.
श्रेणिक लोढा, ठाणेदार, वरूड