गरजूंसाठी झिजलेले चंदनी खोड हरपले
By admin | Published: March 3, 2016 12:26 AM2016-03-03T00:26:10+5:302016-03-03T00:26:10+5:30
राष्ट्रसंताच्या विचाराने भारावलेले व गाडगेबाबांच्या कार्याच्या वसा घेऊन समाजासाठी अविरत झिजलेले चंदनी खोड, येथील जयसिंग महाविद्यालयाचे ...
गावंडे गुरुजींचे निधन : हयातभर ८० टक्के पगार दान
पथ्रोट : राष्ट्रसंताच्या विचाराने भारावलेले व गाडगेबाबांच्या कार्याच्या वसा घेऊन समाजासाठी अविरत झिजलेले चंदनी खोड, येथील जयसिंग महाविद्यालयाचे माजी प्राचार्य वासुदेवराव गावंडे गुरुजी यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी बुधवारी निधन झाले. गुरुजींच्या निधनाने पोरके झाल्याची भावना व्यक्त करीत ग्रामस्थांनी अश्रूंना वाट मोकळी केली.
प्रत्येकाविषयी तळमळ व स्नेहाची भावना असणाऱ्या गुरुजींनी जात, धर्म, पंथ असा भेद कधीच पाळला नाही. गरजुंच्या उपयोगी पडण्याची त्यांची त्यांची तळमळ होती. हयातभर गुरुजींनी त्यांच्या वेतनातील ८० टक्के वाटा हा गरजुंसाठी खर्च केला. समाजकार्यात हिरीरीने भाग घेणारे गुरुजी सर्वांचे अत्यंत लाडके होते. परिसरातील विविध कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान गुरुजींनी भूषवावे असा आग्रह गावकऱ्यांचा असायचा. गावंडे गुरुजींना अंतिम निरोप देण्यासाठी नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. त्यांच्या निधनामुळे येथील पूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. त्यांच्या अंत्ययात्रेत गावकरी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. गुरूजींच्या निधनाने गावात सगळीकडे शोककळा पसरली होती. (वार्ताहर)