शासकीय जागेवर वाळूसाठा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 10:32 PM2018-05-29T22:32:03+5:302018-05-29T22:33:35+5:30
वाळूसाठा करणाऱ्यांच्या मुसक्या आवरण्याचे शासन आदेश असताना शहरात मोठ्या प्रमाणात वाळूचे साठे असूनदेखील त्याकडे महसूल विभागाने दुर्लक्ष चालविले आहे. एवढेच नव्हे, तर वाळूसाठा करणाºयांनी चक्क शासकीय जागेचा वापर केल्याचे वास्तव समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वाळूसाठा करणाऱ्यांच्या मुसक्या आवरण्याचे शासन आदेश असताना शहरात मोठ्या प्रमाणात वाळूचे साठे असूनदेखील त्याकडे महसूल विभागाने दुर्लक्ष चालविले आहे. एवढेच नव्हे, तर वाळूसाठा करणाºयांनी चक्क शासकीय जागेचा वापर केल्याचे वास्तव समोर आले आहे.
वाळू तस्करांवर कठोर कारवाईसाठी राज्य शासन सरसावले आहे. वाळूमाफियांवर लगाम लावण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. वाळूची चोरी रोखणे, हे महसूल विभागाच्या हाताबाहेरचे काम झाले आहे. त्यामुळे शासनाने वाळूमाफियांवर झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्याची (एमपीडीए) मुहूर्तमेढदेखील रोवली आहे.
मात्र, शहरात ठिकठिकाणी वाळूसाठे कायम असताना याकडे स्थानिक महसूल विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. साठा केलेली वाळू चढ्या दरात विकून बांधकामधारकांची लूट केली जात आहे. शहराच्या लोकवस्तीत साठवून ठेवलेली वाळू ही वर्धा, बेंबळा, नदी तर नजीकच्या नाल्यातून उपसा करून आणली जात आहे. गौण खनिज उपसा नियमानुसार वाळूसाठा करणे नियमबाह्य आहे. तरीदेखील शहरात मोठ्या प्रमाणात वाळूसाठा असल्याचे चित्र आहे. वाळूसाठ्याला महसूलच्या अधिकाºयांचे अभय आहे. परिणामी शासनाने वाळूमाफियांवर कारवाई करण्याचे ठरविले असले तरी प्रशासकीय अधिकाºयांचे वाळू तस्करासोबत असलेले लागेबांधे हे कठोर नियमांची अंमलबजावणी करताना छेद देणारे ठरतील, हे सत्य आहे. अमरावती, बडनेरा शहरात वर्धा व बेंबळा नदीतून वाळू विक्रीसाठी आणली जाते. बहुतांश रात्रीलाच वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती आहे. नदीघाटातून क्षमतेपेक्षा जास्त वाळूची वाहतूक करुन ती मोकळ्या जागेवर वाळू साठवणूक केली जाते. त्यानंतर व्यावसायीक ही वाळू ट्रकद्वारे बांधकाम स्थळी पोहचवितात. दोन ट्रक क्षमतेची वाळू आणून ती एकच ट्रक असल्याचे भासवून रॉयल्टी चोरी करण्याचा प्रकार अनेक वर्षांपासून कायम आहे. गौणखनिज चोरीतून वाळू तस्कर गब्बर झाले आहेत. परंतु, वाळूसाठा मध्यवस्तीत असूनही त्याकडे महसूल विभागाने दुर्लक्ष चालविल्याने यात गौडबंगाल असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.
शहरात या भागात आहे वाळूसाठा
नियमांना छेद देत शहरात मोठ्या प्रमाणात वाळूसाठा आहे. यात स्थानिक दंत महाविद्यालयासमोरील प्रांगण, कारागृहाच्या मागील बाजू, राष्ट्रीय महामार्गालगतचे खुले मैदान, वडाळी येथील पाण्याच्या टाकीजवळ, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या बंगल्याजवळ, काँग्रेसनगरस्थित गजानन विद्यालय, वलगाव मार्गालगत अॅकेडमिक हायस्कूलचे प्रांगण, बडनेºयात जुन्या बायपासलगत, महेंद्र कॉलनी येथील खुले मैदान, फ्रेजरपुरा, वडरपुरा मार्ग, विलासनगर मार्गावरील हनुमान मंदिराचे मैदान आदी ठिकाणी वाळूसाठा आहे.
अवैध वाळूसाठा करता येत नाही. त्याअनुषंगाने शासनाने कठोर पावले उचलली असून वाळू साठे करणाºयाविरुद्ध त्वरीत कारवाई केली जाईल.
- अभिजित बांगर
जिल्हाधिकारी, अमरावती.