अचलपूर पालिच्चे स्मशानभूमीत स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:13 AM2021-03-28T04:13:07+5:302021-03-28T04:13:07+5:30
पान ३ साठी अचलपूर : अचलपूर नगर पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाच्यावतीने पालिका हद्दीतील सर्व स्मशानभूमींची साफसफाई अभियान राबविण्यात ...
पान ३ साठी
अचलपूर : अचलपूर नगर पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाच्यावतीने पालिका हद्दीतील सर्व स्मशानभूमींची साफसफाई अभियान राबविण्यात येत आहे. आठवड्यात एका स्मशानभूमीची पूर्ण स्वच्छता करण्यात येणार आहे.
अचलपूर नगरपालिका क्षेत्रातील भैरवघाट स्मशानभूमी, गऊघाट स्मशानभूमी, जीवनपुरा, सुलतानपुरा, स्मशानभूमी, चारवड स्मशानभूमी, मेहराबपुरा, संन्यासपेंड, बिलनपुरा, हनवतपुरा या सातही स्मशानभूमींची पूर्ण स्वच्छता या अभियानांतर्गत करण्यात येत आहे. रस्ता, आजूबाजूची झाडेझुडपे सफाई, स्मशानभूमीची सफाई, कचरा काडी काढणे, काटेरी झुडपे काढणे, दिवाबत्ती, पाण्याची व्यवस्था करणे. गाजरगवत कापणे आदी कामे करण्यात आली. भैरवघाट स्मशानभूमी, गऊघाट स्मशानभूमी, सुलतानपुरा, स्मशानभूमी, सन्यासपेंड स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात आली. आरोग्य विभागाचे संजय समुंद, मुज्जफर, दिनेश पोटेसह पाच-सहा कर्मचारी हे अभियान राबवीत आहेत.
कोट
अचलपूर पालिका हद्दीतील सर्व स्मशानभूमीची दर आठवड्याला स्वच्छता करण्यात येत आहे. पालिका प्रशासनाच्या सहकार्याने साफसफाई अभियान राबविण्यात येत आहे.
- बंटी ककरानिया, आरोग्य सभापती, नगर पालिका, अचलपूर