चिंचोलीच्या दोन शाळा सॅनिटाईज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:13 AM2021-05-16T04:13:24+5:302021-05-16T04:13:24+5:30
वनोजा बाग प्रतिनिधी : चिंचोली बुद्रुक येथे शुक्रवारी आरोग्य विभागामार्फत कोरोना रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. चिंचोली बु. मधीलच ...
वनोजा बाग प्रतिनिधी : चिंचोली बुद्रुक येथे शुक्रवारी आरोग्य विभागामार्फत कोरोना रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. चिंचोली बु. मधीलच शंभर पैकी २० जण पॉझिटिव्ह आल्यामुळे तहसीलदार ॲक्शन मोडवर आले.
चिंचोली बुद्रुक येथील जिल्हा परिषद मराठी शाळा तसेच कौशल्याबाई बारब्दे विद्यालयात विलगीकरण करून दोन शाळा सॅनिटाईज केल्या. जिल्हा परिषद मराठी शाळेत महिलाविलगिकरण आणि कौसल्याबाई बारब्दे विद्यालयात पुरुष विलगीकरणाची सोय केली आहे. नायब तहसीलदार आनंत पोटदुखे पंचायत समितीचे अधिकारी सुधीर डोंगरे, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच तसेच उपकेंद्रे डॉ. पाटील. शिक्षक. ठाणेदार सचिन इंगळे या सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले. शुक्रवारीसुद्धा चाचणी करण्यात आली. यात ६० पैकी २ पॉझिटिव्ह निघाले व ५४ जणांचे अहवाल आरटीपीसीआर अमरावतीकडे पाठविण्यात आल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले.