करजगावात सॅनिटायझर फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:13 AM2021-05-25T04:13:11+5:302021-05-25T04:13:11+5:30
मध्यप्रदेशातील सीईओंचा जन्मगावी प्रेरणादायी उपक्रम करजगाव : कोरोना नियंत्रणासाठी आपल्या जन्मगावी काही तरी करावे, या भावनेतून करजगावात वानखडे कुटुंबाने ...
मध्यप्रदेशातील सीईओंचा जन्मगावी प्रेरणादायी उपक्रम
करजगाव : कोरोना नियंत्रणासाठी आपल्या जन्मगावी काही तरी करावे, या भावनेतून करजगावात वानखडे कुटुंबाने सॅनिटायझर फवारणी करून घेतली. वैयक्तिक पातळीवर संपूर्ण गावाची फवारणी करण्याची वानखडे परिवाराची योजना सर्वांना प्रेरणादायी आहे.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोपाळराव वानखडे व मध्यप्रदेशातील रिवा जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यपालन अधिकारी असलेले त्यांचे पुत्र स्वप्निल वानखडे यांनी सॅनिटायझर फवारणीसाठी निधी दिला. गोपाळराव वानखडे, सरपंच राजेंद्र निशान, उपसरपंच स्नेहा पाटील यांनी ग्रामस्थांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. यामधून गावातील संस्था, प्रार्थनास्थळे आणि घरोघरी फवारणी करण्यात आली. मारुती महाराज मंदिर परिसरापासून फवारणीला सुरुवात झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण देशमुख, कर्मचारी सुनील केचे, दिनकर केचे, हिमांशु देशमुख, मयूर वानखडे, विनोद देशमुख, आशिष धोटे, अंकुश निशान उपस्थित होते. विजय वानखडे, सुंदरलाल देशमुख आणि चमूने प्रत्यक्षात फवारणीची धुरा सांभाळली. यावेळी मान्यवरांनी सॅनिटायझेशन, मास्क, शारीरिक अंतर या विषयावर थोडक्यात मार्गदर्शन केले.