‘महाबीज’च्या बीजोत्पादनात संजय लव्हाळे अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 07:25 PM2020-01-11T19:25:53+5:302020-01-11T19:26:01+5:30
टाकरखेडा संभू (अमरावती) : अमरावती तालुक्यातील शिराळा येथील प्रगतिशील शेतकरी संजय गुणवंतराव लव्हाळे यांनी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) ...
टाकरखेडा संभू (अमरावती) : अमरावती तालुक्यातील शिराळा येथील प्रगतिशील शेतकरी संजय गुणवंतराव लव्हाळे यांनी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) कडून उत्कृष्ट बियाणे उत्पादन करणाºयांमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
'महाबीज'कडून अनेक वर्षांपासून सोयाबीन, तूर, हरभरा यांसारख्या अनेक पिकांचा बीजोत्पादन कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिराळा येथील संजय लव्हाळे यांनी सोयाबीन व हरभरा पिकांचे प्लॉट तयार केले. उच्च प्रतीचे बियाणे तयार करून शेतकºयांनी महाबीजला दिल्यानंतर ते प्रथम तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविले गेले. लव्हाळे यांच्याकडून पाठविलेल्या नमुन्याची उगवणशक्ती तपासल्यानंतर हे बियाणे या प्रक्रियेत प्रथम क्रमांकावर राहिले. त्यानिमित्त महाबीजचे अमरावती येथील व्यवस्थापकीय अधिकारी एस.पी. देशमुख, प्लॉट मॅनेजर अल्लमवार, जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी टिक्कास यांच्यासह अधिकारी व कर्मचाºयांच्या उपस्थितीत संजय लव्हाळे यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यामुळे लव्हाळे यांच्याकडून कृषीविषयक माहिती घेण्यासाठी शेतकºयांचा ओघ वाढला आहे.