तुकडोजी महाराजांची महासमाधी व प्रार्थना मंदिर ३१ तारखेपर्यंत बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 12:16 AM2020-03-19T00:16:16+5:302020-03-19T00:18:18+5:30

 गुरुकुंज मोझरीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची महासमाधी व प्रार्थना मंदिर कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी टाळण्यासाठी आजपासून ते ३१ मार्च पर्यत बंद करण्यात आले आहे.

Sant Tukadji Maharaj Mausoleum Temple and Prayer Temple closed till 31st March | तुकडोजी महाराजांची महासमाधी व प्रार्थना मंदिर ३१ तारखेपर्यंत बंद 

तुकडोजी महाराजांची महासमाधी व प्रार्थना मंदिर ३१ तारखेपर्यंत बंद 

googlenewsNext

- अमित कांडलकर
गुरुकुंज मोझरी (अमरावती) - सबके लिये खुला है मंदिर यह हमारा।मतभेद को भुला है,मंदिर यह हमारा।आओ कोई भी धर्मी,आओ कोई भी पंथी।असा संदेश देणाऱ्या  गुरुकुंज मोझरीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची महासमाधी व प्रार्थना मंदिर कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी टाळण्यासाठी आजपासून ते ३१ मार्च पर्यत बंद करण्यात आले आहे.

दरम्यान दररोज सकाळी होणारे सामुदायिक ध्यान व सायंकाळी होणारी सामुदायिक प्रार्थना ही नियमित सुरू राहील, परंतु या दोन्ही कार्यक्रमाला फक्त पाच गुरूदेव भक्त उपस्थित राहतील असे अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या  वतीने सांगण्यात आले आहे.तसेच दररोज ध्यान व प्रार्थनेला येणाऱ्या गुरूदेव भक्तांनी घरीच ध्यान व प्रार्थना करन्याच्या सूचना ही देण्यात आल्या आहे. दरम्यान इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची समाधी व प्रार्थना मंदिर हे दीर्घ काळासाठी बंद ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे.सोबतच अस्थि विसर्जन सुद्धा बंद राहील याची भाविकांनी नोंद घ्यावी असे सेवा मंडळाच्या वतीने सांगण्यात आले

Web Title: Sant Tukadji Maharaj Mausoleum Temple and Prayer Temple closed till 31st March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.