संत्रा पॅकिंग कारखान्याला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 05:24 PM2017-07-28T17:24:45+5:302017-07-28T17:26:59+5:30
स्थानिक तिवसाघाट मार्गावरील एका संत्रा पॅकिंग कारखान्याला आग लागून पाच वाहनांसह सुमारे ७० लाखांचे नुकसान झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. यात दोन बोकड होरपळून दगावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड (अमरावती) : स्थानिक तिवसाघाट मार्गावरील एका संत्रा पॅकिंग कारखान्याला आग लागून पाच वाहनांसह सुमारे ७० लाखांचे नुकसान झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. यात दोन बोकड होरपळून दगावले.
प्राप्त माहितनुसार, तिवसाघाट मार्गावर शेंदूरजना घाट येथील अब्दुल राजिकभाई यांचा संत्रा पॅकिंगचा कारखाना आहे. या कारखान्याला शुक्रवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. कारखान्यात प्लास्टिक व खरड्याच्या वस्तू असल्यामुळे आगीने लवकरच रौद्र रूप धारण केले. यावेळी कारखान्यात ठेवलेले तीन ट्रक, एक ट्रॅक्टर व वॅगन, हजारो प्लॉस्टिक कॅरेट होते. येथेच कारखाना मालकाचे दोन बोकड बांधून होते. तेदेखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
घटनेची माहिती मिळताच वरूड व शेंदूरजनाघाट नगर परिषदेचे अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. जळालेल्या मालाची किंमत सुमारे ७० लाख रुपये असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळाचा पंचनामा वरूड व शेंदूरजनाघाट पोलिसांनी केला.