सरळ खरेदी प्रकरणातील प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह निधी मिळवून द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:10 AM2021-07-22T04:10:09+5:302021-07-22T04:10:09+5:30

अमरावती : सरळ खरेदी प्रकरणातील प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह निधी मिळवून देण्याचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी दिले. येथील ...

Sanugrah funds should be provided to project affected people in direct purchase cases | सरळ खरेदी प्रकरणातील प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह निधी मिळवून द्यावा

सरळ खरेदी प्रकरणातील प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह निधी मिळवून द्यावा

Next

अमरावती : सरळ खरेदी प्रकरणातील प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह निधी मिळवून देण्याचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी दिले.

येथील जलसंपदा विभागाच्या सिंचन भवनात प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत बैठक जलसंपदा राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत झाली, त्यावेळी ते बोलत होते. पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सु. अ. राठी, भूसंपादन अधिकारी वर्षा पवार, प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी, विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यातील विविध प्रकल्प निर्मिती होत असताना अनेकांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. शेतकरी, गावकरी बांधवांनी जमिनी दिल्या म्हणूनच प्रकल्प पूर्णत्वास आले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला संबंधित विभागाकडून मिळाला पाहिजे. परंतु, सरळ खरेदी प्रकरणातील काही प्रकल्पग्रस्तांना अद्याप मोबदला मिळाला नाही. तसे निवेदनेही जलसंपदा विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे यासंबंधी तत्काळ कार्यवाहीचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्र्यांनी दिले.

सरळ खरेदी प्रकरणातील लाभार्थ्यांना कोकण विभागातील अरुणा प्रकल्प, वर्धा प्रकल्प तसेच सोफिया मॉडेलमध्ये ज्याप्रकारे मोबदला अदा करण्यात आला, त्याचा अभ्यास करून सर्व संदर्भ नमूद करून त्याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करावा, असे निर्देश जलसंपदा राज्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. येत्या १५ दिवसात ही कार्यवाही पूर्ण करून कार्यपूर्ती अहवाल सादर करण्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Sanugrah funds should be provided to project affected people in direct purchase cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.