अमरावतीत आढळली सापाला खाणारी गोम

By admin | Published: June 19, 2017 12:16 AM2017-06-19T00:16:16+5:302017-06-19T00:16:16+5:30

शहरातील म्हाडा कॉलनी स्थित वीज उपक्रेंद परिसरात विचित्र गोम आढळल्याने खळबळ उडाली.

Sapala eating goblet found in Amravati | अमरावतीत आढळली सापाला खाणारी गोम

अमरावतीत आढळली सापाला खाणारी गोम

Next

परिसरात खळबळ : विषारी, तीव्र वेदनादायी डंख
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील म्हाडा कॉलनी स्थित वीज उपक्रेंद परिसरात विचित्र गोम आढळल्याने खळबळ उडाली. सर्पमित्रांनी गोमची ओळख पटविल्यानंतर ती सापांसह लहान पाली, बेडूक, पक्ष्यांचे लहान पिले व अन्य कीटक खात असल्याची माहिती समोर आली.
वीज उपक्रेंदातील कर्मचाऱ्यांनी साप आढळल्याची माहिती सर्पमित्र अभिजित दानी यांना दिली. त्यानुसार दानी व अनिकेत देशमुख यांनी वीज केंद्रावर जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी मोठ्या आकाराची गोम असल्याचे दिसून आले. पिवळ्या लालसर अंगावर आडवे काळे पट्टे व पिवळे पाय असलेल्या या गोमला ‘ईडियन्स जायन्ट टायगर सेंटीपिड’ अशा शास्त्रीय नावाने ओळखले जाते. ६ इंच लाब आढळलेल्या या गोमची लांबी ही एक फुटापर्यंत मोठी असू शकते. या गोमचा डंक अत्यंत विषारी आणि वेदनादायी असल्याचे मत सर्पमित्राचे आहे. पावसाळ्यात मुख्यत: ही गोम आढळून येते. सर्पमित्र सायंके यांच्या माहितीनुसार जोर्ज निव पोर्ट या ब्रिटिश वैज्ञानिकाने सर्वप्रथम गोमचे निरीक्षण करून शोधप्रबंध प्रकाशित केला आहे. या गोम खाद्य वेगळे आहेत. ही गोम लहान पालीचे पिल्ले, सापाची पिल्ले, बेडूक, पक्ष्यांचे पिल्ले व अन्य कीटक मोठ्या आवडीने खात असल्याची माहिती आहे.

२००७ मध्ये पहिली नोंद
२००७ मध्ये या गोमची पहिली नोंद अमरावतीत झाली होती. डॉ. जंयत वडतकर यांच्या चमूला ती आढळून आली. त्यानंतर सर्पमित्र गणेश अकर्ते यांना २०११ मध्ये पाचशे क्वार्टर परिसरात ही गोम मृतावस्थेत आढळून आली आहे. वन्यजीव प्रेमी निलेश कंचनपुरे यांनीही या प्रजातीची गोम आढळून आली होती. वसा संस्थेच्या २०१५ मधील सातपुडा एक्स्पिडिशन दरम्यान सर्पमित्र शुभम सायंके व त्याच्या चमुला ही या प्रजातीची गोम मोर्शी तालुक्यात आढळून आली होती. १.५ सेमी व ४ इंच लांबीच्या गोम रस्त्यावर मृतावस्थेत आढळलेल्या नानेटी सापाला खाताना दिसून आली होती.

Web Title: Sapala eating goblet found in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.