सारेगमप फेम ज्ञानेश्वर मेश्राम व अनिरुद्ध जोशीने अमरावतीकरांना जिंकले

By Admin | Published: January 3, 2016 12:35 AM2016-01-03T00:35:31+5:302016-01-03T00:35:31+5:30

सारेगमप फेम ज्ञानेश्वर मेश्राम, अनिरूद्ध जोशी, गायिका वैशाली उपाध्ये यांनी एकापेक्षा एक सुरेश विठ्ठलाचे भावगिते व मराठमोळ गीत सादर करून ....

Saregupam Fame Dnyaneshwar Meshram and Aniruddha Joshi won the Amravatikar | सारेगमप फेम ज्ञानेश्वर मेश्राम व अनिरुद्ध जोशीने अमरावतीकरांना जिंकले

सारेगमप फेम ज्ञानेश्वर मेश्राम व अनिरुद्ध जोशीने अमरावतीकरांना जिंकले

googlenewsNext

अवतरली पंढरी : विठू माऊलीच्या गजराने रसिक झाले मंत्रमुग्ध
अमरावती : सारेगमप फेम ज्ञानेश्वर मेश्राम, अनिरूद्ध जोशी, गायिका वैशाली उपाध्ये यांनी एकापेक्षा एक सुरेश विठ्ठलाचे भावगिते व मराठमोळ गीत सादर करून अमरावतीकरांनी रिझविली. जणू काही अख्खी पंढरी येथे अवतरली आहे. विठू माऊलीच्या गजराने संत सांस्कृतिक सभागृह दुमदुमून निघाला. सारेगमप फेम अनिरूद्ध जोशी व ज्ञानेश्वर मेश्राम या अंबानगरीच्या सुपुत्रांनी विठूरायांचे मराठमोळ भावगीते सादरीकरण करून अमरावतीकरांची दाद मिळविली. यावेळी श्रोते काही वेळापुरते मंत्रमुग्ध झाले होते.
अनिरूद्ध जोशींनी खेळ मांडला, विठू माऊली, माझे माहेर पंढरी, राधा ही बावरी, पहिले न मी तुला, या गितांचे दर्जेदार सादरीकरण करून श्रोत्यांना खिळवून ठेवले तर वारकरी संप्रदाय गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांनी झेंडा गीत गायले. विठू माऊली, माझे माहेर पंढरी ही गीते सादर करुन श्रोत्यांना तल्लीन केले. विठूरायाच्या गोडगीतांनी भाविक खिळवून गेले. वैशाली उपाध्ये यांनी रेश्माच्या रेघांनी मेहंदीच्या पानावर असे सुरेख गीत सादर करून वाह वाह मिळविली. तबलावादक पंकज यादव व रिधम वादक सचिन गुडे, अक्षय हरणे यांनी त्यांना उत्तम साथ दिली. संचालन मोना चिमोटे व अनिता कुळकर्णी यांनी तर आभार सोमेश्वर पुसदकर यांनी मानले. यावेळी गिरीश गांधी, आ. सुनील देशमुख, माजी मंत्री वसुधा देशमुख, रामदास फुटाणे तसेच रसिक वर्ग उपस्थित होता.

Web Title: Saregupam Fame Dnyaneshwar Meshram and Aniruddha Joshi won the Amravatikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.