सरपंच निश्चित; उपसरपंचपदासाठी चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:12 AM2021-02-07T04:12:28+5:302021-02-07T04:12:28+5:30

पान ३ राजुरा बाजार : येथील १३ सदस्यीय ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी पॅनेलला नऊ, तीन जागा भारतीय जनता पक्षाचे समर्थकांना, ...

Sarpanch fixed; Churas for the post of Deputy Panch | सरपंच निश्चित; उपसरपंचपदासाठी चुरस

सरपंच निश्चित; उपसरपंचपदासाठी चुरस

Next

पान ३

राजुरा बाजार : येथील १३ सदस्यीय ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी पॅनेलला नऊ, तीन जागा भारतीय जनता पक्षाचे समर्थकांना, तर एक जागा अपक्षाला मिळाली. सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने ते पद महाआघाडी समर्थित पॅनेलऐवजी तीन सदस्यीय भाजपप्रणीत पॅनेलकडे जाणार आहे. महाविकास आघाडीप्रणीत पॅनेलचे जे नऊ सदस्य निवडून आलेत, त्यापैकी राष्ट्रवादी समर्थित दिलीप भोंडे गटाचे तीन सदस्य असल्याने अंतर्गत चुरस वाढली आहे.

परिसरातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या राजुरा बाजारकडे तालुक्यातील राजकीय मंडळींचे लक्ष असते. जरूड जिल्हा परिषद सर्कलमधील हे गाव राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे. ग्रामपंचायतच्या अटीतटीच्या निवडणुकीत गावकऱ्यांनी महाविकास आघाडीला स्पष्ट कौल दिला. मात्र, सरपंचपदासाठी आवश्यक अनुसूचित जमातीचा उमेदवार भाजप गटाजवळ असल्याने महाविकास आघाडी गट हिरमुसला आहे. उपसरपंच हा महाविकास आघाडीचा होईल, हे जरी खरे असले तरी राष्ट्रवादी गटाची निर्णायक भूमिका राहणार आहे.

Web Title: Sarpanch fixed; Churas for the post of Deputy Panch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.