सरपंच निश्चित; उपसरपंचपदासाठी चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:12 AM2021-02-07T04:12:30+5:302021-02-07T04:12:30+5:30
पान ३ राजुरा बाजार : येथील १३ सदस्यीय ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी पॅनलला नऊ, तीन जागा भारतीय जनता ...
पान ३
राजुरा बाजार : येथील १३ सदस्यीय ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी पॅनलला नऊ, तीन जागा भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांना, तर एक जागा अपक्षाला मिळाली. दरम्यान, सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने ते पद महाआघाडीसमर्थित पॅनलऐवजी तीन सदस्यीय भाजपप्रणीत पॅनलकडे जाणार आहे. महाविकास आघाडीप्रणीत पॅनलचे जे नऊ सदस्य निवडून आलेत, त्यापैकी राष्ट्रवादी समर्थित दिलीप भोंडे गटाचे तीन सदस्य असल्याने अंतर्गत चुरस वाढली आहे.
परिसरातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या राजुरा बाजारकडे तालुक्यातील राजकीय मंडळींचे लक्ष असते. जरूड जिल्हा परिषद सर्कलमधील हे गाव राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे. ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या निवडणुकीत गावकऱ्यांनी महाविकास आघाडीला स्पष्ट कौल दिला. मात्र, सरपंचपदाचा एसटी उमेदवार भाजप गटाजवळ असल्याने महाविकास आघाडी गट हिरमुसला आहे; परंतु उपसरपंच हा महाविकास आघाडीचा होईल, हे जरी खरे असले तरी राष्ट्रवादी गटाची निर्णायक भूमिका राहणार आहे.