खेड येथील सरपंच निघाल्या कर वसुलीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:13 AM2021-03-08T04:13:45+5:302021-03-08T04:13:45+5:30

‘ग्राम समृद्ध करा अभियान’ : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मोर्शी : तालुक्यातील खेड येथील नवनिर्वाचित महिला सरपंच कल्याणी ...

Sarpanch of Khed goes out to collect taxes | खेड येथील सरपंच निघाल्या कर वसुलीला

खेड येथील सरपंच निघाल्या कर वसुलीला

Next

‘ग्राम समृद्ध करा अभियान’ : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मोर्शी : तालुक्यातील खेड येथील नवनिर्वाचित महिला सरपंच कल्याणी प्रीतम राजस या खेड गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच करवसुलीसाठी घरोघरी फिरत आहेत. घर टॅक्स भरा, ग्राम समृद्ध करा या अभियानाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सुखद चित्र आहे.

सरपंच पदाचा पदभार स्वीकारताच सचिव मांडे व आपले सहकारी ग्राम सदस्य यांच्या सहकार्यान सरपंचांनी घर टॅक्स भरा ग्राम समृद्ध करा’ हे अभियान हाती घेतले. त्यांनी ग्रामस्थांना घर टॅक्स व पाणीपट्टी कराबाबत संकल्पना समजावून सांगत जवळपास ३६ हजार रुपयाचा घर टॅक्स वसूल केला. राजकीय वारसा लाभलेल्या या महिला सरपंच पहिल्यांदाच करवसुली करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या. त्यांना गावकऱ्यांचे सहकार्यसुद्धा मिळत आहे. घर टॅक्स वसुली करून खेड गावात विकासात्मक कामाला सुरुवात करण्यात येईल, असे मत सरपंच कल्याणी राजस यांनी व्यक्त केले.

Web Title: Sarpanch of Khed goes out to collect taxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.