सरपंच ग्रामविकासाचा सूत्रधार झाला पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:12 AM2021-08-01T04:12:29+5:302021-08-01T04:12:29+5:30
भास्करराव पेरे पाटील, पाटोद्याला भेट, ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्रचा उपक्रम मोर्शी : गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला ...
भास्करराव पेरे पाटील, पाटोद्याला भेट, ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्रचा उपक्रम
मोर्शी : गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. सरपंच हा ग्रामविकासाचा सूत्रधार झाला पाहिजे, असे मार्गदर्शन अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श ग्राम पाटोदा येथील सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले. ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्यतर्फे सरपंचांना पाटोदा येथे नेण्यात आले होते. यावेळी खेड (ता. मोर्शी) येथील सरपंच तथा महिला प्रदेश अध्यक्ष कल्याणी राजस यांनी ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी खुला संवाद साधला. प्रत्येक ग्रामपंचायतीने पाटोदा ग्रामपंचायत पाहून यावी, असे आवाहन त्यांनी केले.
शासकीय योजनेपेक्षा गावाला काय हवे, कसली गरज आहे, कुणाचे सहकार्य घ्यावे हे महत्वाचे आहे. स्वच्छ व मुबलक प्रमाणात पाणी, भुयारी गटारे, स्वच्छता व एप्रिलमध्येच शंभर टक्के कर वसुली यावर आपला भर असेल, असे कल्याणी राजस यांनी सांगून ग्रामसभेला पूर्ण उपस्थितीसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.