सरपंचाच्या पतीची दबंगगिरी

By admin | Published: August 25, 2016 12:06 AM2016-08-25T00:06:32+5:302016-08-25T00:06:32+5:30

ग्रामपंचायतच्या कामात अडथळा निर्माण करुन ग्रा.पं.च्या चपराशाला शिवीगाळ व मारपीट तसेच धमकी देणाऱ्या भर्रेगाव ग्रामपंचायतच्या

Sarpanch's husband Dabangagiri | सरपंचाच्या पतीची दबंगगिरी

सरपंचाच्या पतीची दबंगगिरी

Next

चपराशाला मारहाण : अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल
देवरी : ग्रामपंचायतच्या कामात अडथळा निर्माण करुन ग्रा.पं.च्या चपराशाला शिवीगाळ व मारपीट तसेच धमकी देणाऱ्या भर्रेगाव ग्रामपंचायतच्या महिला सरपंचाच्या पतीविरुद्ध देवरी पोलीस
ठाण्यात अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा मंगळवारी दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, २२ आॅगस्टला नित्याप्रमाणे भर्रेगाव ग्रा.पं.चे चपराशी मोहनलाल विठू कोचे ग्रा.पं.मध्ये टॅक्स पावती फाडण्याचे व घरकुल लाभार्थ्याचे फॉर्म भरुन देत असताना दुपारी १ वाजता सरपंच विद्या खोटेलेचे पती सुरेंद्र शिवराम खोटेले ग्रा.पं.मध्ये आले व लोकांचे काम करीत असणाऱ्या चपराशी मोहन कोचेला आदेश देत घर टॅक्स पावती फाडण्याचे काम बंद कर व पहिल्यांदा माझा फॉर्म भरुन दे असे म्हणाले. त्यावर चपराशाने थोडा वेळ थांबा नंतर तुमचे फार्म भरुन देतो असे म्हणताच सरपंचाच्या पतीने चपराशाच्या जवळील रजिस्टर हिसकावले व त्याची कॉलर पकडून त्याला बाजूच्या दरवाजावर ढकलले.
यावेळी त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करीत पाहून घेण्याची धमकी दिली. या प्रकरणावरुन क्षुब्ध झालेले चपराशी मोहनलाल कोचे यांनी २३ आॅगस्टला देवरी ठाण्यात तक्रार दाखल केली.
देवरी पोलिसांनी आरोपी सुरेंद्र शिवराम खोटेले यांच्यावर अनुसूचित जाती, जनजाती, अत्याचार प्रतिबंधक अधिनियमच्या कलम ३ (१) (१०) व भादंवि च्या कलम १८६, ३३२, ३५३, ५०४, ५०६ कलमात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास देवरीचे ठाणेदार राजेश् तटकरे व त्यांचे सहकारी करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Sarpanch's husband Dabangagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.