सेमाडोहच्या बँकेत आदिवासी शेतकऱ्यांची ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:09 AM2021-07-03T04:09:23+5:302021-07-03T04:09:23+5:30

चिखलदरा : तालुक्यातील सतत वादग्रस्त ठरणाऱ्या सेमाडोह येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकाने आदिवासी शेतकऱ्यांना वेठीस धरले असून, ...

Saseholpat of tribal farmers in the bank of Semadoh | सेमाडोहच्या बँकेत आदिवासी शेतकऱ्यांची ससेहोलपट

सेमाडोहच्या बँकेत आदिवासी शेतकऱ्यांची ससेहोलपट

Next

चिखलदरा : तालुक्यातील सतत वादग्रस्त ठरणाऱ्या सेमाडोह येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकाने आदिवासी शेतकऱ्यांना वेठीस धरले असून, पीककर्जासाठी नाहक त्रास देत आहे. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करीत व्यवस्थापकाची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

सेमाडोह येथे स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. तेथील काही कर्मचारी, अधिकारी दारूच्या नशेत कारभार चालवत असल्याचे यापूर्वीच उघडकीस आले आहे. बँके अंतर्गत अतिदुर्गम असलेल्या हतरुसह परिसरातील किमान ३० गावांचे खाते एकच बँक असल्याने पीक कर्जासाठी आदिवासी शेतकऱ्यांना शाखा व्यवस्थापक नाहक त्रास देत असल्याची तक्रार आदिवासी शेतकऱ्यांनी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्याकडे केली होती. यावर संबंधित शाखा व्यवस्थापकाविरुद्ध कारवाई करून त्यांची हकालपट्टीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या एका तक्रारीतून आमदार पटेल यांनी केली आहे.

बॉक्स

पायदळ येतात आदिवासी

मेळघाटात आजही पाहिजे त्या प्रमाणात वाहतूक सुविधा वजा महामंडळाच्या बस पहिल्या बंद असल्यामुळे त्याचा फटका आदिवासींना बसला आहे. प्रशासकीय व इतर खाजगी कामासाठी त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रायपूर हतरु आणि इतर परिसरात खाजगी दुचाकी किंवा चारचाकी वाहन व्यतिरिक्त गोरगरीब शेतकऱ्यांना पायपीट करीत यावे लागते. त्यातही बँकेचे व्यवस्थापक अनेक त्रुट्या काढून त्रास देत असल्याचे आदिवासींचे म्हणणे आहे.

Web Title: Saseholpat of tribal farmers in the bank of Semadoh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.