अंजनगाव तालुक्यातील विद्यार्थिनीने बनविला उपग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:13 AM2021-02-07T04:13:12+5:302021-02-07T04:13:12+5:30

फोटो पी ०६ स्वसितका नरेंद्र जावरे कॉमन परतवाडा (अमरावती) : डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन या संस्थेच्यावतीने नागपूर ...

Satellite made by a student from Anjangaon taluka | अंजनगाव तालुक्यातील विद्यार्थिनीने बनविला उपग्रह

अंजनगाव तालुक्यातील विद्यार्थिनीने बनविला उपग्रह

Next

फोटो पी ०६ स्वसितका

नरेंद्र जावरे

कॉमन

परतवाडा (अमरावती) : डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन या संस्थेच्यावतीने नागपूर येथे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या जगातील सर्वात कमी म्हणजे २५ ते ८० ग्रॅम वजनाचे शंभर उपग्रहांचे प्रक्षेपण रामेश्वरम् येथे एकाचवेळी ७ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. विदर्भातील १६० विद्यार्थी त्यात सहभागी झाले. पैकी अंजनगाव तालुक्यातील सेंट मेरी इंग्लिश स्कूल या शाळेच्या स्वस्तिका विलासराव वाघ या इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीनेसुद्धा उपग्रह बनविला आहे.

दहा विद्यार्थी मिळून एक उपग्रह तयार करण्यात आला. असे एकूण शंभर उपग्रह तयार केले आहेत. देशातील एक हजार विद्यार्थ्यांनी त्यात भाग घेतला. १९ जानेवारी रोजी यासाठी नागपूर येथे एक कार्यशाळा घेण्यात आली होती. २ ते ७ जानेवारी दरम्यान या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले होते. यात देशभरातील एक हजार विद्यार्थांमधून राज्यभरातून ३८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. अंजनगाव येथील सेंट मेरी इंग्लिश कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी स्वस्तिका विलासराव वाघ या विद्यार्थिनीनेसुद्धा उपग्रह बनवून या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. त्या उपग्रहांची बांधणी नागपूर व पुणे येथे करण्यात आली.

या उपग्रहांना ३५ हजार ते ३८ हजार मीटर उंचीवर हाय अल्टीट्यूड सायंटिफिक बलूनमार्फत प्रक्षेपित केले जाणार आहे. हे संपूर्ण उपग्रह एका स्पेसमध्ये बसविण्यात येतील. यासोबतच पॅराशुट, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम, लाईव्ह कॅमेरा जोडलेला असेल. तेथून प्रत्यक्ष ओझोन, कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण आणि इतर माहिती हे उपग्रह पृथ्वीवरील केंद्राला पाठवतील. विद्यार्थ्यांनी २५ ते ८० ग्रॅम बजनाचे उपग्रह तयार केले आहे. त्याची चाचणीही घेण्यात आल्याची माहिती संस्थेचे सरचिटणीस मिलिंद चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली.

बॉक्स

उपग्रह करतील विविध विषयांवर अभ्यास

प्रत्येक उपग्रह वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करणार आहे. त्यामध्ये ओझोन, आर्द्रता, हवेत कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण किती? आहे?, प्रदूषण किती? आदी अभ्यास केला जाणार आहे. उपग्रह एका बॉक्समध्ये फिट करून हेलियम बलूनला जोडून सोडल्यावर ३५ ते ३८ हजार मीटर उंचीवर गेल्यावर पडून फुटेल, त्यातील बॉक्स कोसळायला सुरुवात होईल. आणि त्याच वेळेस त्याला जोडलेले पॅराशुट उघडतील. जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम द्वारे लाईव्ह कॅमेरे अ‍ॅक्टिव्हेट होतील. १२७ किलोमीटर वर हे सर्व बॉक्स रिकव्हर केले जाणार आहेत. जगात एक हजार विद्यार्थी एकत्र येऊन उपग्रह बनविण्याचा हा जागतिक उपक्रम आहे.

कोट

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन, स्पेस झोन इंडिया तसेच चेन्नई येथील मार्टीन ग्रुप यांच्या सहकार्याने रामेश्वरम येथून ७ फेब्रुवारी रोजी १०० उपग्रह सोडले जाणार आहेत. देशातील हजार विद्यार्थ्यांमध्ये राज्यातील ३६० विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे.

- मिलिंद चौधरी,

सरचिटणीस, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाउंडेशन

Web Title: Satellite made by a student from Anjangaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.