रेल्वे मालमत्तांचे सॅटेलाईटने संरक्षण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 11:56 PM2018-03-26T23:56:53+5:302018-03-26T23:56:53+5:30

रेल्वेस्थानक परिसर व खुल्या जागांवर वाढते अतिक्रमणावर सॅटेलाईटने संरक्षण केले जाणार आहे. दरम्यान रेल्वे मालमत्तांचे संरक्षण करण्यात रेल्वे सुरक्षा बल कुचकामी ठरल्याचा अभिप्राय वरिष्ठांनी नोंदविला आहे. अमरावती व बडनेरा येथील रेल्वे मालमत्तांचे येत्या वर्षात सॅटेलाईटने संरक्षण केले जाणार आहे.

Satellite protection of railway assets! | रेल्वे मालमत्तांचे सॅटेलाईटने संरक्षण !

रेल्वे मालमत्तांचे सॅटेलाईटने संरक्षण !

Next
ठळक मुद्देरेल्वेस्थानक, खुल्या जागांवर नजरअतिक्रमण रोखण्यासाठी नवी संकल्पना

आॅनलाईन लोकमत
अमरावती : रेल्वेस्थानक परिसर व खुल्या जागांवर वाढते अतिक्रमणावर सॅटेलाईटने संरक्षण केले जाणार आहे. दरम्यान रेल्वे मालमत्तांचे संरक्षण करण्यात रेल्वे सुरक्षा बल कुचकामी ठरल्याचा अभिप्राय वरिष्ठांनी नोंदविला आहे. अमरावती व बडनेरा येथील रेल्वे मालमत्तांचे येत्या वर्षात सॅटेलाईटने संरक्षण केले जाणार आहे.
रेल्वे प्रशासनाकडे मोठ्या संख्येने खुले भूखंड असून, त्यांची देखभाल, संरक्षण करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे रेल्वेने ईस्त्रोसोबत मालमत्तांचे उपग्रहाद्वारे नियंत्रण ठेवण्यासंदर्भात करार केला आहे. काही महिन्यांत रेल्वेस्थानक, खुले भूखंड, कर्मचारी वसाहती, विश्रामगृह, अधिकाऱ्यांचे बंगले आदी मालमत्तांबाबतची नोंद उपग्रहाच्या नियंत्रण यंत्रणेत केली जाणार आहे. रेल्वे मालमत्तांच्या चोरीच्या घटना वारंवार होत असून, यावर कुणाचेही अंकुश नाही. त्यामुळे मुंबई मध्य रेल्वे विभागातंर्गत पाचही विभागात एक नियंत्रण कक्ष स्थापन केला जाणार आहे. या कक्षातून रेल्वेचे अधिकारी सर्व मालमत्तांची माहिती प्रमुख नियंत्रण कक्षाला उपलब्ध करून देतील. त्यानंतर मुख्य नियंत्रण केंद्रातून ईस्त्रोला पाठविण्यात येईल, जेथे संबंधित स्थानकांची नोंद उपग्रहाच्या नियंत्रण यंत्रणेत केली जाणार आहे. रेल्वेच्या सर्व मालमत्तांंचा आराखडा तयार केल्यानंतर जीआयएस पोर्टल विकसित केले जाईल. हे पोर्टल पूर्णपणे जीपीएस प्रणालीवर आधारित असणार आहे. या पोर्टलसाठी रेल्वे प्रशासनाने जोरदार तयारी चालविली आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत हे पोर्टल उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पोर्टलसाठी सीआरआयएस (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम्स) नव्या एप्लिकेशनची निर्मिती केली जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने मालमत्तांची देखरेख यंत्रणा बळकट करण्याचे दिशानिर्देश दिले आहे.
उपग्रहांद्वारे २४ मालमत्तांवर असेल लक्ष
रेल्वेस्थानक, मालमत्तांचे मॅपिंगच्या हिशेबाने उपग्रहात चिन्हांकित स्थान अपलोड केले जाईल. त्यामुळे २४ तास अशा स्थानांवर नजर ठेवली जाणार असून, रेल्वेस्थानकांचादेखील यात समावेश असणार आहे. अतिक्रमण होताना दिसून आल्यास केंद्रातून ही माहिती रेल्वे सुरक्षा यंत्रणेला दिली जाणार आहे.
बडनेऱ्यात अतिक्रमणाची मोठी समस्या
बडनेरा रेल्वे हद्दीत अतिक्रमण झाले असून, ही समस्या गंभीर आहे. माताफैल, पाचबंगला, स्विपर कॉलनी, कांशीराम चाळ परिसर, रेल्वे स्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार आदी भागात घरे, झोपड्या निर्माण करण्यात आल्याची माहिती आहे. प्रवेशद्वाराला अतिक्रमणाचा वेढा असून ते हटविण्यासाठी प्रशासन तत्परता दाखवीत नाही.

रेल्वे मालमत्तांचे सॅटेलाईटने नजर असणार, ही बाब प्रशासनासाठी अतिशय चांगली आहे. रेल्वेच्या खुल्या जागांवर अतिक्रमण ही समस्या गंभीर असून, आता वरिष्ठांकडून याप्रकरणी दखल घेतल्याने रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने ही समस्या दूर करता येईल.
- आर.टी. कोटांगळे,
प्रबंधक, अमरावती रेल्वेस्थानक

Web Title: Satellite protection of railway assets!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.