शनिवारी उच्चांकी ८०६ संक्रमनमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:13 AM2021-03-07T04:13:20+5:302021-03-07T04:13:20+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने रिकव्हरी रेट ९६ वरून ८१ टक्क्यांवर आलेला आहे. शनिवारी आतापर्यंत उच्चांकी ८०६ ...
अमरावती : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने रिकव्हरी रेट ९६ वरून ८१ टक्क्यांवर आलेला आहे. शनिवारी आतापर्यंत उच्चांकी ८०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. उपचारानंतर बरे वाटल्याने सातव्या दिवसी सकाळी रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ३१ हजार ७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर रुग्ण उपचारार्थ दाखल होतो व त्यांना पाच दिवसांचा औषधांचा कोर्स दिल्यानंतर सातव्या दिवशी घरी पाठविण्यात येत आहे. त्यानंतर या रुग्णावर आरोग्य यंत्रणेचे कुठलेच लक्ष राहत नाही. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार रुग्णाने १० ते ११ दिवसांपर्यंत चाचणी केल्यास अहवाल पॉझिटिव्ह येतो. म्हणजेच त्याचे शरिरात कोरोनाचा विषाणू असतो व नंतरचे तीन दिवस अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्या रुग्णापासून अन्य व्यक्तीला संसर्ग होत नाही व त्यासाठीचा १४ दिवसांचा विलगिकरणाचा कालावधी असल्याचे सांगण्यात आले.
सुरुवातीच्या काळात १५ दिवस संक्रमित रुग्णांवर उपचारानंतर झाल्यानंतर सलग अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना डिस्चार्ज दिला व आजारातून बरे झाल्यावर त्यांना हिंमत वाढविण्यासाठी जिल्हा व आरोग्य प्रशासनातील अधिकारी टाळ्या वाजवून स्वागत करीत असत. मात्र, मे महिन्यानंतर रुग्णसंख्या वाढली व कोरोनाग्रस्तांना १० दिवसांनी डिस्चार्ज देण्याबाबत आरोग्य विभागाच्या गाईडलाईन आल्यात व आता सातव्या दिवशीच संक्रमित रुग्णांना डिस्चार्ज दिला जात असल्याने पुढच्या सात दिवसांतील होम क्वारंटाईन रुग्णांवर कोण ‘वाॅच’ ठेवणार, हा प्रश्न निर्माण झालेला आहे.