विलोभनीय कडीचा शनी २७ ऑगस्टला पृथ्वीजवळ येणार, दुर्बिणीने पाहता येणार विलोभनीय दृश्य

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: August 4, 2023 04:06 PM2023-08-04T16:06:20+5:302023-08-04T16:27:13+5:30

खगोलीय घटना : प्रतियुतीमध्ये सूर्यासमोर राहणार शनी

Saturn close to Earth on the 27th august | विलोभनीय कडीचा शनी २७ ऑगस्टला पृथ्वीजवळ येणार, दुर्बिणीने पाहता येणार विलोभनीय दृश्य

विलोभनीय कडीचा शनी २७ ऑगस्टला पृथ्वीजवळ येणार, दुर्बिणीने पाहता येणार विलोभनीय दृश्य

googlenewsNext

अमरावती : सूर्यमालेतील सर्वांत सुंदर विलोभनीय रिंग असणारा शनी ग्रह २७ ऑगस्टला पृथ्वीच्या जवळ राहणार आहे. या दिवशी शनी ग्रह हा अगदी सूर्यासमोर राहील. याला खगोलशास्त्रात प्रतियुती म्हणतात. प्रतियुतीच्या आसपास शनी व पृथ्वी यांचे सरासरी अंतर कमी असते. त्यामुळे या काळात शनीची सुंदर कडा चांगल्या प्रकारे दिसू शकते. तथापि ही रिंग साध्या डोळ्यांनी नव्हे तर टेलिस्कोपने पाहावी लागणार आहे.

शनीला एकूण ८२ चंद्र आहेत, यामध्ये सर्वांत मोठा चंद्र टायटन आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक चक्कर मारायला २९.५ वर्षे लागतात. या ग्रहाचा व्यास १.२० लाख किमी व तापमान शून्याखाली १८० अंश सेंटिग्रेड आहे. या ग्रहाची घनता सर्वांत कमी आहे. शनीची रिंग २.७० लाख किमीपर्यंत पसरलेली व बर्फाची आहे. शनीचे वस्तुमान पृथ्वीच्या ९५ पट आहे.

पृथ्वी ज्यावेळी शनीच्या विषववृत्त पातळीत असते, अशावेळी शनीचे कडे पृथ्वीवरून चांगल्या प्रकारे दिसू शकते. शनीचा अभ्यास करणारे पहिले मानवरहित यान ‘कॅसिनी’ आहे. व्हायोजर या मानवरहित यानानेदेखील शनीचे जवळून छायाचित्र घेतले असल्याची माहिती मराठी विज्ञान परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौसी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.

मानवी जीवनावर कोणताही अनिष्ट परिणाम नाही

२७ ऑगस्ट रोजी सूर्य मावळल्यानंतर लगेच शनी ग्रह हा पूर्व क्षितिजावर उगवेल व पहाटे पश्चिम क्षितिजावर मावळेल. हा ग्रह रात्रभर आकाशामध्ये दिसेल. हा ग्रह रात्रभर काळसर व पिंगट रंगाचा व चमकदार दिसेल. त्यामुळे हा ग्रह ओळखता येईल. हा ग्रह पृथ्वीच्या जवळ आल्याने मानवी जीवनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे खगोलशास्त्रज्ञांनी सांगितले.

Web Title: Saturn close to Earth on the 27th august

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.