पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 10:16 PM2018-03-16T22:16:05+5:302018-03-16T22:16:05+5:30
ज्या ठिकाणी दृष्काळ असतो, त्यांंंना पाण्याचे महत्त्व कळते. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी वाचेल तेथे वाचविले पाहिजे व ते सर्वांचीच जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केले.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : ज्या ठिकाणी दृष्काळ असतो, त्यांंंना पाण्याचे महत्त्व कळते. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी वाचेल तेथे वाचविले पाहिजे व ते सर्वांचीच जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केले. जलसंपदा विभागात आयोजित जलजागृती सप्ताहात उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
जलसंपदा विभाग, इंडियन वॉटर व इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनीअरिंग यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकाºयांच्या हस्ते शुक्रवारी दीपप्रज्वलन करून १६ ते २२ मार्च दरम्यान शासन व जलसंपदा विभागाच्यावतीने राबविल्या जाणाºया जलसप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधीक्षक अभियंता रमेश ढवळे होते. प्रमुख उपस्थिती मुख्य अभियंता रवींद्र लांबेकर, उपजिल्हाधिकारी काळे, मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) घाणेकर, अधीक्षक अभियंता जलतारे, व अधीक्षक अभियंता दक्षता विभाग बागडे, प्रभारी कृ षी अधीक्षक अनिल खर्चान, कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे आदींची उपस्थिती होती. यावेळी विभागातील पाचही महत्त्वाच्या नद्यांचे जल आणून मान्यवरांच्या हस्ते जलपुजन व जलकळस स्थापना करण्यात आली. यावेळी मुख्य अभियंता संजय घाणेकर यांनी जलप्रतिज्ञा दिली. यावेळी अधीक्षक अभियंता रमेश ढवळे यांनीसुद्धा पाण्याचे महत्त्व पटवून सांगितले आणि पाण्याची बचत करण्याची सुरुवात आपल्या घरापासून करा, असे ते म्हणाले. प्रास्ताविक कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे व संचालन तायडे यांनी केले. जलसंपदा विभागाचे सहा कार्यकारी अभियंता, उपअभियंता व शाखा अभियंता, सर्व कर्मचारी अधिकारी, मजीप्रा कार्यकारी अभियंता जंवजाळ आदी उपस्थित होते.
मधमाशीप्रमाणे जबाबदारी घ्या
मधमाश्यांचे पोळे लागल्यानंतर जशी प्रत्येक लहान माशी आपले कामे जबाबदारीने पूर्ण करते तसेच विदर्भातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी व पाण्याची साठवण व सिंचन क्षमता वाढविण्यासाठी प्रत्येकाक डे जबाबदारी दिली आहे. ती प्रामाणिकपणे पूर्ण करायला हवी. पाऊस हा लहरी आहे. त्याची शाश्वती नसते. त्यामुळे प्रत्येक थेंब वाचविणे गरजचे आहे. त्यासाठी जलसप्ताहातच नव्हे, तर वर्षभर प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असा सल्ला जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी उपस्थितांना दिला.