“शेतकरी वाचवा - लोकशाही वाचवा’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:10 AM2021-06-26T04:10:13+5:302021-06-26T04:10:13+5:30
अमरावती : केंद्र सरकारने संसदेत मंजूर करून घेतलेल्या शेतकरीविरोधी तीन कृषी कायद्यांविरोधात व हमीभाव कायद्याच्या मागणीसाठी २६ जूनला ‘शेती ...
अमरावती : केंद्र सरकारने संसदेत मंजूर करून घेतलेल्या शेतकरीविरोधी तीन कृषी कायद्यांविरोधात व हमीभाव कायद्याच्या मागणीसाठी २६ जूनला ‘शेती वाचवा - लोकशाही वाचवा’ या देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. यानिमित्त अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आणि कामगार कृती समिती जिल्हा शाखेच्यावतीने दुपारी १२ वाजता राजकमल चौक येथे निदर्शने आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या ऐतिहासिक आंदोलनाला २६ जूनला सात महिने पूर्ण होत आहेत. जोपर्यत कृषिकायदे सरकार मागे घेणार नाही तसेच शेतीमालासाठी हमीभावाचा कायदा करीत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच ठेवण्याचा व तीव्र करण्याचा निर्धार संयुक्त किसान मोर्चाने केला आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीत आंदोलन होत आहे. समन्वय समितीच्या बैठकीला आपचे महेश देशमुख, भाकपचे राज्य सचिव तुकाराम भस्मे, रोशन अर्डक, अशोक सोनारकर, विजय रोडगे, महादेव गारपवार, सतीश ठाकूर, सिटूचे सुभाष पांडे, आयटकचे चंद्रकांत बानुबाकोडे, निळकंठ ढोके आदी पदाधिकारी उपस्थित होते.