‘मला वाचवा’ तरुणीचा टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:52 AM2019-08-03T00:52:52+5:302019-08-03T00:53:37+5:30

शुक्रवारी भर दुपारी १२.१५ वाजताची वेळ. नवसारी पॉवर हाऊससमोर वाहनांची वर्दळ असताना रस्त्याच्या कडेला उभ्या तरुणीला दोन तरुण चारचाकी वाहनांत कोंबत होते. ती ‘मला वाचवा’ अशी विनवणी करीत होती. परिसरातील नागरिकांचे त्याकडे लक्ष वेधले गेले आणि त्यांनी मदतीसाठी धाव घेतली.

'Save me!' | ‘मला वाचवा’ तरुणीचा टाहो

‘मला वाचवा’ तरुणीचा टाहो

Next
ठळक मुद्देअपहरणाने हादरला नवसारी परिसर : प्रियकराचा प्रताप; नागरिक मदतीला धावले

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शुक्रवारी भर दुपारी १२.१५ वाजताची वेळ. नवसारी पॉवर हाऊससमोर वाहनांची वर्दळ असताना रस्त्याच्या कडेला उभ्या तरुणीला दोन तरुण चारचाकी वाहनांत कोंबत होते. ती ‘मला वाचवा’ अशी विनवणी करीत होती. परिसरातील नागरिकांचे त्याकडे लक्ष वेधले गेले आणि त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, त्यापूर्वीच ते तरुण वाहनासह पसार झाले. गाडगेनगर पोलिसांंनी तात्काळ पाठलाग करून दोन तासांत अपहृतासह दोन तरुणांना पकडण्यात यश मिळविले. प्रेमप्रकरणाला विरोध असल्याने प्रियकराने हा प्रताप केल्याचे या घटनेत पुढे आले आहे.
मदतीसाठी धावलेल्या नागरिकांनी अपहरणात सहकार्य करणाऱ्या एका तरुणीला पकडून ठेवले आणि घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस पथकाच्या स्वाधीन केले. तिच्या चौकशीतून पोलिसांनाअपहरणकर्त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. अहरणकर्त्यांनी त्या मुलीला मोबाइलवर चुकीचा मार्ग सांगितला. त्यामुळे पोलिसांची दिशाभूल झाली. त्यामुळे त्यांचे मोबाइल लोकेशन घेण्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेण्यात आली.
येसुर्णा ते असदपूर मार्गावर गाठले
अमरावती : पोलिसांनी मार्ग बदलवून लोकेशननुसार अपहरणकर्त्याचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी अपहरणकर्ता त्या मुलीला घेऊन दुचाकीवर होता. पोलिसांनी अपहरणकर्त्यांना येसुर्णा ते असदपूर मार्गावर गाठले. त्यांना ताब्यात घेण्यात आले.
मक्रमपुरातून घेतली दुचाकी
अपहरणकर्ता गोपाल गाडेने एमएच ३० एल ९९६२ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने प्रेयसीचे अपहरण करून तिला मक्रमपूर येथील जावयाच्या गावी नेले. गोपालचा मित्र पवन नंदू रायबोले (२४, रा. आष्टी) याचे हे चारचाकी वाहन आहे. गुरुवारी त्याने ही चारचाकी घेतली. ती रस्त्यावरच ठेवून गोपाल जावयाच्या घरी गेला आणि एमएच ३० बीई ४५७८ क्रमांकाची दुचाकी घेऊन आला. त्यानंतर दुचाकीवर प्रेयसीला बसवून तो अकोलाकडे जाण्यासाठी निघाला.
घटनेनंतर लगेच नाकाबंदी
नवसारीतून तरुणीचे अपहरण झाल्याची माहिती वायरलेसद्वारे सर्व पोलीस ठाण्यांना कळविण् यात आली होती. त्यानुसार वलगाव, नागपुरी गेट, नांदगाव पेठ व ग्रामीण हद्दीतील आसेगाव व परतवाडा पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. मात्र, अपहरणकर्त्यांनी वाहन बदलविल्याने ते हाती लागले नव्हते.
दोन मुलींची चौकशी
अपहरणानंतर नागरिकांनी एका तरुणीला पकडून ठेवले होते. याशिवाय अपहरणकर्त्यांसोबत आणखी एक तरुणी असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे दोन तरुणींचा अपहरणात सहभाग असल्याचे निदर्शनास आले असून, त्यांची पोलीस चौकशी करतील.
तरुणांविरुद्ध गुन्हा
पीडिताच्या वडिलांनी गाडगेनगर पोलिसांत सायंकाळी नोंदविलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गोपाल रमेश गाडे (२५) व शुभम नंदकिशोर झापर्डे (२१, रा. शिवर, अकोला) विरुद्ध भादंविच्या कलम ३६३, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.
प्रेमप्रकरणाला कुटुंबीयांचा विरोध
मुलगी व तिचे अपहरण करणारा गोपाल गाडे हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहे. अनेक वर्षांपासून दोघांचे प्रेम आहे. गोपाल अनेकदा प्रेयसीला घेऊन अकोला येथे गेला. दोघांनीही मंदिरात लग्न केल्याची माहिती आहे. मात्र, या प्रेमप्रकरणाला मुलीचे कुटुंबीय विरोध करीत होते. त्यामुळे गोपालने प्रेयसीच्या अपहरणाची योजना आखली. ही बाब पोलीस चौकशीत पुढे आली आहे.
दोन तासांत आरोपी ताब्यात
नवसारीतून युवतीचे अपहरण झाल्याचे कळताच गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सामटकर, पोलीस हवालदार प्रशांत दीपक वानखडे, प्रशांत बोंडे, प्रशांत वानखडे, दिगांबर चव्हाण यांनी तत्काळ नवसारी गाठले. या घटनेची माहिती पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी अपहरणकर्त्यांचा पाठलाग केला. या पाठलागात वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी वेळोवेळी ठाणेदारांना मार्गदर्शन केले. त्यामुळे दोन तासांतच या घटनेचा उलगडा झाला.

Web Title: 'Save me!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.