सेमाडोह परिक्षेत्रात सायळची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:09 AM2021-06-19T04:09:38+5:302021-06-19T04:09:38+5:30
कॅमेरा ट्रॅपवरून २८ दिवसानंतर चौघांना अटक चिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या सेमाडोह परिक्षेत्रातील जंगलात ...
कॅमेरा ट्रॅपवरून २८ दिवसानंतर चौघांना अटक
चिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या सेमाडोह परिक्षेत्रातील जंगलात अवैधरीत्या प्रवेश करून सायळ प्राण्याची शिकार केल्याप्रकरणी वनाधिकाऱ्यांनी चौघांना अटक केली. कॅमेरा ट्रॅपच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आला. अचलपूर न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवले.
पुन्या बेठेकर, भानू कास्देकर, अशोक कास्देकर व रितेश कास्देकर (रा. सर्व माखला) अशी व्याघ्र प्रकल्पाने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी वन्यप्राणी सायळची कुऱ्हाडीने सेमाडोह परिक्षेत्रातील माखला वर्तुळाचे पश्चिम माखला बिटमध्ये शिकार केली. त्यानंतर जंगलातच तिचे काटे काढून सोलून भाजून फस्त केली. हा सर्व प्रकार आरोपी परतीच्या मार्गावर असताना जंगलातील ट्रॅप कॅमेरामध्ये दिसून आला.
वन्यप्राणी प्रगणना २०२१ अंतर्गत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात माखला येथील ट्रॅप कॅमेरामध्ये मे महिन्यात वन्यप्राण्याची शिकार करुन जातांना काही इसम दिसून आले. त्यांचा ट्रॅप कॅमेरामध्ये आलेल्या फोटोग्राफच्या आधारे शोध घेतला असता, २८ दिवसानंतर सदर आरोपी हे माखला येथील असल्याचे दिसून आले. आरोपीना वनक्षेत्रपाल सम्राट मेश्राम यांनी ताब्यात घेतले. पुढील तपास सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनात आरएफओ सम्राट मेश्राम, वनरक्षक एच. एस. देशमुख, पवन नाटकर, गणेश मुरकुटे, संदीप ठाकरे, मंगेश धोंगडे, वनपाल देवानंद वानखडे, बापुराव खैरकर करीत आहेत.
.
बॉक्स
सायळ खातो सांबराचे सिंग, वाघाची होते शिकार
सायाळ हा शेडूल फोर मधील प्राणी असून अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. जंगलात सांबरचे पडलेले सिंग नैसर्गिकरीत्या नष्ट होत नाही. परंतु, सायळ एकमेव प्राणी ते सिंग खातो. दुसरीकडे याची शिकार करताना हा अंगावर काटे सोडतो. पायात काटा अडकल्याने वाघाच्या बच्छडाचासुद्धा मृत्यू झाल्याची घटना काही वर्षांपूर्वी उघडकीस आली होती, हे विशेष.
बॉक्स
सावधान, जंगलात फिराल तर
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात फिरणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यासाठी सर्व ठिकाणे कॅमेरे लावण्यात आले असून, कॅमेरेसुद्धा चोरटे अनेकदा चोरून नेत असल्याच्या घटना घडत आहे. पोलिसांत अनेकदा तक्रारी दाखल झाल्यामुळे आता जंगलात फिरल्यास कॅमेऱ्याची नजर तुमच्यावर असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
===Photopath===
180621\img-20210618-wa0036.jpg
===Caption===
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात सायळ ची शिकार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी