रेल्वे स्थानकावर निरोप देणेही महागले; प्लॅटफार्म तिकीट १०, पार्किंग २० रुपये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:17 AM2021-08-25T04:17:36+5:302021-08-25T04:17:36+5:30
अनलॉकनंतर गर्दी वाढली, प्लॅटफार्मवर प्रवाशांची गर्दी वाढली, रेल्वेच्या उत्पन्नात झाली वाढ अमरावती : रेल्वे स्थानकाच्या दर्जानुसार पार्किंग वाहनांसाठीचे दर ...
अनलॉकनंतर गर्दी वाढली, प्लॅटफार्मवर प्रवाशांची गर्दी वाढली, रेल्वेच्या उत्पन्नात झाली वाढ
अमरावती : रेल्वे स्थानकाच्या दर्जानुसार पार्किंग वाहनांसाठीचे दर वेगवेगळे आहेत. मात्र, हल्ली प्लॅटफार्मसाठी १० रुपये तिकीट दर आकारले जात आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर पाठवायला जाणेही महाग झाले असून, प्लॅटफार्म आणि पार्किंग शुल्क असा दुहेरी फटका नागरिकांना बसत आहे.
मार्च २०२० पासून कोरोनाकाळात रेल्वे गाड्या बंद होत्या. त्यामुळे रेल्वे स्थानक ओस पडले होते. यानंतर विशेष गाड्या प्रारंभ झाल्यात. आता राज्यात अनलॉक होताच रेल्वेने अवागमन वाढले आहे. अशातच रेल्वे स्थानकावर ने-आण करणाऱ्यांचीदेखील गर्दी वाढली आहे. मात्र, ‘अ’ रेल्वे स्थानकावर वाहन पार्किंगचे दर ४० ते ५० रुपये आणि ‘ब’ दर्जाच्या रेल्वे स्थानकावरील पार्किंगचे दर २० ते ३० रुपये असे आकारले जात आहे. कोरोनात रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये, यासाठी ११ जून २०२० पूर्वी प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये आकारले जात होते. मात्र, प्रवाशांच्या तक्रारी वाढताच पुन्हा आता १० रुपये प्लॅटफार्म तिकीट आकारले जात आहे.
----------------------
असे वाढले दर
२०१९------------ ५ रुपये, १० रुपये
२०२०---------------- ५० रुपये, ३० रुपये
२०२१ ---------------- १० रुपये, २० रुपये
प्लॅटफार्म तिकिट रेल्वे पार्किंग तिकीट दर
--------------------
प्लॅटफार्म तिकीटमधून रेल्वेची कमाई
अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकाहून रेल्वेला प्लॅटफार्म तिकिटातून कमाई मिळत आहे. अलीकडे लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये गर्दी वाढत असताना पाहुणे, आप्तांना निरोप देण्यास जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बडनेरा रेल्वे स्थानकावर दरदिवशी ३५० ते ४०० असे प्लॅटफार्म तिकीटची विक्री होत आहे. अमरावती रेल्वे स्थानकावर ४० ते ५० प्लॅटफार्म तिकिटांची विक्री होत असल्याची माहिती आहे.
------------------
पार्किंग सर्वात अधिक महाग
- बडनेरा रेल्वे स्थानकावर दुचाकीसाठी १० रुपये, तर चारचाकी वाहनांसाठी २० रुपये आकारले जातात. रेल्वेने पार्किंगचे कंत्राट सोपविले आहे.
- अमरावती रेल्वे स्थानक ‘अ’ दर्जाचे आहे. त्यामुळे येथील पार्किंग महागडे आहे. चारचाकी वाहनांसाठी ३० रुपये घेण्यात येते. मात्र, एकच गाडी सुरू असल्याने पार्किंग कंत्राट बंद आहे.
- पाहुणे अथवा आप्तांना रेल्वे प्लॅटफार्मवर सोडायचे असल्यास पार्किंग शुल्क आणि प्लॅटफार्म तिकीट असा दुहेरी फटका बसताे.
----------------------
‘प्लॅटफार्मचे तिकीटचा दर १० रुपये आकारला जात आहे. जून २०२१ पूर्वी प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये घेण्यात येत होते. आता पार्किंग बंद असल्याने शुल्क आकारणीचा प्रश्नच नाही. प्लॅटफार्म तिकीट घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
- .............. लोहकरे, प्रबंधक अमरावती रेल्वे स्थानक
------------------
विशेष रेल्वे गाड्यांनी प्रवास करायचा असल्यास आरक्षण तिकीट घेऊनच करावा लागतो. अशातच पार्किंगचे दर हे देखील अव्वाच्या सव्वा आकारले जात असल्याने आर्थिक फटका बसत आहे.
- रवि केसवानी, प्रवासी
-------
नातेवाइकांना रेल्वे स्थानकावर पाेहाेचविण्यासाठी जाताना दुहेरी आर्थिक फटका बसतो. घरातील दोन ते तीन सदस्य असल्यास प्रत्येकी १० रुपयांप्रमाणे प्लॅटफार्म तिकीट घ्यावे लागते तसेच वाहन पार्किंगचे ३० रुपये हा नवा भार असतो.
- राजेश सपकाळे, प्रवासी