म्हणे....मोदी सरकारचा छापा मारून आणून देतो! चार अनोळखी महिलांनी लांबविले अडीच लाखांचे दागिणे

By प्रदीप भाकरे | Published: November 11, 2023 01:03 PM2023-11-11T13:03:03+5:302023-11-11T13:03:44+5:30

मोदी सरकारचा छापा मारून आणून देण्याची बतावणी करून सुमारे २.५३ लाख रुपयांचे सोन्याचे दागिणे लांबविण्यात आले.

Say....Modi brings the government by raiding! | म्हणे....मोदी सरकारचा छापा मारून आणून देतो! चार अनोळखी महिलांनी लांबविले अडीच लाखांचे दागिणे

म्हणे....मोदी सरकारचा छापा मारून आणून देतो! चार अनोळखी महिलांनी लांबविले अडीच लाखांचे दागिणे

अमरावती: मोदी सरकारचा छापा मारून आणून देण्याची बतावणी करून सुमारे २.५३ लाख रुपयांचे सोन्याचे दागिणे लांबविण्यात आले. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वसाहतीत हा प्रकार घडला. याप्रकरणी, राजापेठ पोलिसांनी १० नोव्हेंबर रोजी महिलेच्या तक्रारीवरून ३० ते ३५ वर्षे वयोगटातील चार अनोळखी महिलांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

 राजापेठ ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक महिला बुधवारी सकाळी घरगुती काम करत असताना चार अनोळखी महिला त्यांच्या घरात शिरल्या. तोरड्या व अन्य सोन्याचांदीचे भांडे चमकवून देण्याची बतावणी केली. त्यावर छापा मारून दिला. त्यामुळे महिलेचा त्या अनोळखी महिलांवर विश्वास बसला. त्यापुढे जाऊन त्या महिलांनी फिर्यादी महिलेला सोन्याचे दागिणे चमकवून देण्याची बतावणी केली.

दागिणे अधिक असल्याने चमकविण्यासाठी वेळ लागेल, असे सांगून त्या महिला तब्बल २ लाख ५३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे सोबत नेले. मात्र दोन दिवस उलटूनही त्या महिला सोने घेऊन न परतल्याने महिलेला फसवणुकीची जाणीव झाली. त्यानंतर त्यांनी ९ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास राजापेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

Web Title: Say....Modi brings the government by raiding!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.