एसबीआयचे डेबिट कार्ड घरच्या पत्त्यावरून परत गेल्यास ब्लॉक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 10:13 PM2019-01-04T22:13:44+5:302019-01-04T22:14:12+5:30
एकीकडे काही बँकांचे नवीन डेबिट कार्ड हॉटलिस्टेड होण्याचा प्रकार घडत आहेत. एसबीआयने खातेदारांना घरच्या पत्यावर पाठविलेले डेबिट कार्ड त्यांना मिळाले नसेल व घरच्या पत्यावरून परत गेले असल्यास ते कार्ड ब्लॉक करण्यात येत असल्याची नवीन माहिती पुढे आली आहे. याविषयी बँकेत या व कार्ड अन्ब्लॉक करून घ्या, असा सल्ला एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी खातेदारांना दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एकीकडे काही बँकांचे नवीन डेबिट कार्ड हॉटलिस्टेड होण्याचा प्रकार घडत आहेत. एसबीआयने खातेदारांना घरच्या पत्यावर पाठविलेले डेबिट कार्ड त्यांना मिळाले नसेल व घरच्या पत्यावरून परत गेले असल्यास ते कार्ड ब्लॉक करण्यात येत असल्याची नवीन माहिती पुढे आली आहे. याविषयी बँकेत या व कार्ड अन्ब्लॉक करून घ्या, असा सल्ला एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी खातेदारांना दिला.
आरबीआयने ३१ डिसेंबरपूर्वी सर्व बँकांनी खातेदारांना नवी मास्टर चिप लावलेले डेबिट कार्ड देणे बंधनकारक केले होते. त्यामुळे ज्या बँक खातेदारांकडे जुने डेबिटकार्ड असेल ते बंद करण्यात आले आहे. यातील काहींना नवीन डेबिटकार्ड मिळालेले नाहीत, अशा खातेधारकांनी बँकांकडे धाव घेतली आहे. पण, काही खातेदारांचे नवीन डेबिटकार्ड हॉटलिस्टेड होत असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. यासंदर्भाची माहिती घेण्याकरिता शहरातील एका एसबीआयच्या शाखेत भेट दिली असता, त्यांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले की, प्रत्येक बँकांची डेबिट कार्ड सेवा वेगवेगळी आहे. बँकेतर्फे संबंधित खातेधारकांना एटीएम पाठविले आहेत. पण, यामध्ये जर कुणाच्या घराचा पत्ता चुकला असेल किंवा पत्ता बदलला असेल, अशा खातेदारांचे एटीएम कार्ड परत बँकेकडे येतात. त्याला तात्पुरते ब्लॉक करण्यात येते. सदर डेबिट कार्ड कुणाच्या हाती लागू नये किंवा याचा गैरवापर होऊ नये, हा या मागील उद्देश आहे. ज्यांना डेबिट कार्ड मिळाले नाही, अशा खातेदारांनी बँकेत आल्यानंतर ते डेबिट कार्ड संबंधितांना अनब्लॉक करून मिळत असल्याचेही ते म्हणाले. सायबर गुन्हे घडू नये, याकरिता खातेदारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून डेबिटकार्डमध्ये मास्टर चिप लावून विविध बँकांमार्फत त्यांच्या खातेदारांना डेबिट कार्ड मिळत आहेत.
एटीएम कार्डची माहिती मागितल्यास सावधान!
नवीन चिप बेस एटीएम कार्ड नवीन आर्थिक फसवणुकीचे प्रकार असू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सावधान राहावे, या आशयाचे एक पत्र परभणी जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने सायबर सेलच्या सहायक पोलीस निरीक्षकांनी काढले आहे. असेच माहितीपर पत्र अमरावती पोलिसांनीही काढल्याची माहिती आहे. यामध्ये असे नमुद करण्यात आले आहे की, सर्वच बँकांनी जुने एटीएमकार्ड बदलून नवीन चिप बेस एटीएम कार्ड अनिवार्य केलेले आहे. ३१ डिसेंबरला हे कार्ड बंद झाल्याने काही बँकांनी संपसुद्धा केला होता. याच परिस्थितीचा फायदा घेऊन आर्थिक आॅनलाईन फसवणूक करणारे गुन्हेगार आपल्याला फोन करून एटीएम कार्ड बंद झाल्याचे सांगितले. व तुम्हाला नवीन एटीएम कार्ड घेण्याकरिता, खातेदारांच्या अकाऊंटची माहिती मागतील. त्यामुळे खातेदारांनी अशी कुठलीही माहिती त्यांना देऊू नये, यासंदर्भात आपल्या आप्तमंडळींनाही जागृत करा, असे आवाहान परभणी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले होते. स्वत:ला बँकेचा अधिकारी दाखवून आॅनलाईन आर्थिक फसवणुकीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. असे फसवणूक करणारे लोक खातेधारकास फोन करून आपल्या खात्याची व डेबिट कार्डची माहिती मागवून घेऊन आॅनलाईन आर्थिक फसवणूक करीत आहेत, अशावेळी गोपनीय माहिती देऊन नये, असा इशारा त्यांनी जनहितार्थ जारी केलेल्या पत्रातून दिला. त्या अनुषंगाने नागरिकांनी आपल्या खात्याबाबत कुणालाही फोनद्वारे माहिती देऊ नये, व होणाºया आर्थिक फसवणुकीपासून सावध राहावे, असले फसवणुकीचे कॉल आल्यास संबंधित बँकेत संपर्क साधून सत्य पडताळून घ्यावे, असेही सूचित करण्यात आले होते.